करमाळासोलापूर जिल्हा

खाजगी लसीकरणाला जिल्ह्यात 62 ठिकाणी तर करमाळा तालुक्यात तीन ठिकाणी मान्यता !

करमाळा समाचार 

Covid-19 लसीकरण कार्यक्रमांतर्गत खाजगी लसीकरण केंद्राच्या मान्यता साठी प्रस्ताव पाठवण्यात आले होते. त्यापैकी जिल्ह्यात 62 ठिकाणी खाजगी लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये करमाळा तालुक्‍यातील तीन हॉस्पिटलचे मान्यता मिळाल्याची माहिती मिळत आहे.

करमाळा तालुक्यात राजेश्वर हॉस्पिटल राजुरी, कुर्डे हॉस्पिटल केम, दुरंदे हॉस्पिटल कोर्टी असे तीन हॉस्पिटलची यामध्ये नावे आहेत. तर करमाळा शहरातील एकही हॉस्पिटल नसल्याने शहरवासीयांच्या तसेच परिसरातील गावांच्या निराशा होणार आहे हे नक्की. संबंधित लसीकरणासाठी वैयक्तिक हॉस्पिटलने पुढाकार घेऊन लसीकरणासाठी परवानगी घेणे अपेक्षित होते. परंतु तसं शहरातील प्रस्ताव न गेल्याने एकाही ठिकाणी लसीकरण केले जाणार नाही.

यासंदर्भात खाजगी covid-19 लसीकरण केंद्रासाठी प्रस्ताव वैद्यकीय अधीक्षक व तालुका आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत मागणी केली होती. त्यानुसार वैद्यकीय अधीक्षक व तालुका आरोग्य अधिकारी यांनी प्रस्तावांची छाननी करून मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवले होते. त्यानुसार जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या covid-19 लसीकरण जिल्हा कार्य बल गट समिती सभेमध्ये नमूद अटी व शर्तीच्या अधीन राहून मान्यता देण्यात आली असली तरी या बाबतचे पत्र आज दिनांक 3 रोजी सोशल माध्यमांमध्ये जाहीर झाले आहे. लवकरच या लसी संबंधित दवाखान्यांमध्ये उपलब्ध होतील. या पत्रावर जिल्हा आरोग्य अधिकारी शितल कुमार जाधव व जिल्हा लसीकरण अधिकारी अनिरुद्ध पिंपळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE