करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळा समाचारच्या बातमीवर शिक्कामोर्तब ; पोलिसांच्या कारवाईनंतर गुन्हेगारी विश्व चव्हाट्यावर

करमाळा समाचार

काही दिवसांपूर्वी करमाळा तालुका हा गुन्हेगारी हब म्हणून ओळखला जात असल्याबाबत संशय व्यक्त करण्यात आला होता. त्याला कारणही तसेच होते करमाळ्यातून अतिशय महागडा आणि जीवघेणा असा एम डी ड्रग मिळून येत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. आता त्यावर पोलिसांनी शिक्कामोर्तब करत मौलाली माळ येथील एकाला करमाळा येथुन ताब्यात घेतले आहे. त्यामुळे नेमकं हा ड्रग आला कुठून व त्याच्या मागे कोणता मास्टरमाईंड काम करतोय हे शोधणे पोलिसांसाठी आव्हान असणार आहे.

करमाळा तालुक्यात विविध घटना अवैध दारू बनावट दारू व ड्रग्स सारखे दुर्मिळ असे ड्रग्स करमाळ्यात मिळून येऊ लागले होते. यावेळी पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातील एकाला जामखेड पोलिसांनी जामखेड येथे अटक केली होती. त्यावेळी करमाळा येथून सदर ड्रग विक्री केली जात असल्याची संशय व्यक्त करत करमाळ्यातही तपास करण्यात आला. परंतु संबंधित विक्रेता हा करमाळ्यात मिळून आला नव्हता.

दरम्यानच्या काळात संबंधित व्यक्ती हा कर्जत परिसरात असून करमाळ्याचा व ड्रग्स विक्रीचा काही एक संबंध नसल्याची माहिती छातीठोकपणे करमाळा पोलिसांकडून सांगण्यात आली होती. परंतु आता करमाळ्यातच ड्रग्स घेऊन एक व्यक्ती मिळून आल्याने स्वतः पोलिसांनीच त्यांच्या कारवाईनंतर संबंधित विक्री करमाळ्यात होत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता नेमके ड्रग्स कुठे किती आणि कोणाच्या वरदहस्ताने विक्री केली जात आहे आणि आतापर्यंत या गोष्टी लपून कशा राहिल्या याचा शोध घेणे गरजेचे आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE