करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळ्यात बिबट्याच्या वावराच्या चर्चेला दुजोरा; ऊसतोड कामगारांना आढळले बिबट्याचे पिल्लू!

करमाळा समाचार

करमाळा तालुक्यात बिबट्याच्या वावराबाबत सुरू असलेल्या चर्चेला आता बिबट्याचे पिल्लू आढळल्याच्या घटनेमुळे अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. ऊसतोड सुरू असताना ऊसतोड कामगारांना वीट येथील उसाच्या शेतात बिबट्याचे पिल्लू आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात वन्यप्राण्यांच्या वावराबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

ऊसतोड कामगारांना पिल्लू आढळल्यानंतर त्याला हातात घेतल्याचे छायाचित्रही समोर आले आहे. ऊसतोडीच्या हंगामात शेतांमध्ये कामगारांची वर्दळ वाढते. अशा वेळी उसाच्या शेतात वन्यप्राण्यांची पिल्ले आढळल्यास कामगारांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. पिल्लाला हात लावणे किंवा त्याला स्वतःहून दुसरीकडे हलवणे टाळावे. त्याची माहिती तातडीने वनविभागाला द्यावी, जेणेकरून पिल्लाची आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करता येईल.

वनविभागाने घटनास्थळी पाहणी करून पिल्लाची योग्य काळजी घ्यावी तसेच परिसरातील बिबट्याच्या वावराबाबत नागरिकांना स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी होत आहे. तीन दिवसापूर्वी बिबट्या हा नागोबा मंदिर परिसरात आढळला होता.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE