करमाळासोलापूर जिल्हा

फक्त शेतकऱ्यांना दिसण्यासाठी व राजकारणी लोकांना राजकारण कारण्यासाठी सोडले जाते ; रखडलेली कामे पुर्ण करा – घोलप

करमाळा समाचार 

सन १९७१ साली सुरु केली गेलेली हि दहीगाव उपसा सिंचन योजना अजूनही पूर्णत्वास गेली नाही. पाणी सोडले जाते त्यावेळी फक्त तळ्यात ओढ्याने, नाल्याने सोडले जाते. हे पाणी फक्त शेतकऱ्यांना दिसण्यासाठी व राजकारणी लोकांना राजकारण कारण्यासाठी सोडले जाते की काय , त्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

तरच त्या पाण्याचा वापर करणे शक्य आहे . कॅनॉलला पाणी आले नंतर बरेच लोक आपल्या आपल्या परीने मोटारीने ,इंजिनने पाणी द्यावे लागते .तलावात पाणी आले म्हणून समाधान होणार नाही तर ते शेतकऱ्यांच्या शेतात गेले पाहिजे तरच त्याचा फायदा होईल असे मत मनसे अध्यक्ष मा. संजय घोलप यांनी व्यक्त केले आहे .

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की या योजनेवर २४ ते २५ गा वे अवलंबून आहेत .बहुतेक गावांना मुख्य कॅनॉल हि नाहीत त्यामध्ये अर्जुननगर,फिसरे,हिसरे,शेलगाव आदी गावांना याचा कोणताही फायदा घेत येत नाही .माजी आमदार श्री नारायण पाटील यांनी ४१८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मांडला होता त्याचे काय झाले माहित नाही .नुसता कॅनॉल खणून चालणार नाही तर उपचाऱ्याही होणे आवश्यक आहे .तरच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे त्यांनी सांगितले.

हे काम लवकरात लवकर सुरु करा अन्यथा या परिसरातील शेतकरी व मनसे रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मनसे जि.उपाध्यक्ष राजेंद्र मोरे,ता.उपाध्यक्ष अशोक गोफणे, शहर अध्यक्ष नाना साहेब मोरे, म.न.वि.से चे जिल्हा संपर्क अध्यक्ष विजय रोकडे, जि.अध्यक्ष सतिश फंड,जि. उपाध्यक्ष आनंद मोरे, शहरअध्यक्ष सचिन कणसे, अमोल जांभळे, मनसे शहर उपाध्यक्ष रोहित फुटाणे,कैलास काकडे, विजय हजारे स्वप्निल कवडे, आदी उपस्थित होते…

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE