हमीभाव केंद्र आठ दिवसांच्या आत सुरू करण्याची मागणी अन्यथा आंदोलन ….कांबळे
प्रतिनिधी सुनिल भोसले
सध्या करमाळा तालुक्यातील शेतकरी कोरोनाच्या संकटातून कसाबसा सावरुन आर्थिक संकटाला तोंड देत आहे. आपल्या शेतामध्ये पेरणी करत असताना अनेक संकटांवर मात करून आर्थिक परिस्थिती निर्माण झाली असताना देखील पोटाला पिळा देत सावकाराकडून व्याजाने का होईना कर्ज काढून पेरणीसाठी पैसे घेऊन बी बियाणे आणले सुदैवाने तुर उडीद मका सुर्यफुल सारखी पिके जोमात आली. पण भावाची चिंता सतावत असल्याने शासनाने त्याच्या पिकाला योग्य हमीभाव देऊन हमीभाव केंद्र सुरू करावे अशी मागणी शेतकरी कामगार संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

शेतकरी वर्गाने आपला माल विकण्याची घाई करू नये. योग्य हमीभाव मिळावा म्हणून तसेच करमाळा तालुक्यात हमीभाव केंद्र आठ दिवसांच्या आत सुरू करण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करत आहोत. शेतकऱ्यांनी आपला पिकविलेला माल कवडीमोल किंमतीत देऊ नका, लवकर हमीकेद्र सुरू करा म्हणुन प्रयत्न करित आहोत. जर शासनाने आठ दिवसांच्या आत हमीभाव केंद्र सुरू न केल्यास शेतकरी कामगार संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे दशरथआण्णा कांबळे यांनी माध्यमांशी बोलताना आवाहन केले आहे .
