करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

बाजार समीती मा. संचालकाची सदाभाऊंच्या रयत संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड

प्रतिनिधी- करमाळा समाचार

मा. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत साहेब यांच्या रयत क्रांती संघटनेच्या सोलापूर जिल्हा कार्यकारणी व तालुका कार्यकारिणी तील पदाधिकाऱ्यांच्या निवडी टेंभुर्णी येथे जाहीर करण्यात आल्या. पदाधिकाऱ्यांची निवड रयत क्रांती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले व जिल्हा समन्वयक प्रा. सुहास पाटील सर रयत क्रांती संघटनेचे विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष ॲड कृष्णा सूर्यवंशी राज्य कार्यकारिणी सदस्य छगन पवार यांची प्रमुख उपस्थितीत पार पडल्या रयत क्रांती संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी गणेश मंगवडे यांची फेरनियुक्ती करण्यात आली.

शिवशंकर जगदाळे मा. मार्केट कमिटी संचालक यांची रयत क्रांती संघटना तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली व तालुका उपाध्यक्ष पदी संतोष माने ग्रा.पं. सदस्य कंदर यांची निवड करण्यात आली यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष अण्णा जाधव युवा जिल्हाध्यक्ष नंदकुमार व्यवहारे करकंब माढा तालुका अध्यक्ष दत्तात्रय गायकवाड राहुल बाबर बळीराम गायकवाड कुंदन भालेराव भीमराव पवार विराग मांडवकर बार्शी धर्मेश कोठारी गणेश पवार अप्पा थिटे जगदिश मस्के अशोक भानवसे प्रशांत करळे अमोल गवळी महावीर नरसाळे बबन भोसले आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते त्यानिमित्ताने यावेळी राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले म्हणाले की रयतक्रांती संघटनेतील कार्यकर्त्यांचे जिल्ह्यामध्ये शेतकरी शेतमजूर व सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मोठे योगदान आहे. आ. सदाभाऊ खोत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात यशस्वी वाटचाल सुरू आहे.या निवड प्रसंगी जिल्हा समन्वयक प्रा. सुहास पाटील सर म्हणाले येथून पुढील काळात संघटनेमध्ये बरेच कार्यकर्ते काम करण्यास उत्सुक आहेत.भविष्यकाळात सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात येतील.यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य छगन पवार विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष ॲड कृष्णा सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले व संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या व आभार नुतन जिल्हाध्यक्ष गणेश मंगवडे यांनी मानले व कार्यक्रम संपन्न झाला.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE