करमाळासामाजिकसोलापूर जिल्हा

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पुतळा सुशोभित कामाची त्रयस्थ अभियंत्याकडुन चौकशी करावी

प्रतिनिधी सुनिल भोसले

करमाळा शहरातील पोथरे रोड वरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पुतळा सुशोभितकरणाचे काम निकृष्ठ दर्जाचे करण्यात आले असुन याची त्रयस्थ अभियंता मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या कडे करमाळा नगरपालिकेच्या माजी नगरसेविका बानु फारूक जमादार यांनी केली आहे.


यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन 2011-12 ते सन 2015-16 या काळात मी करमाळा नगरपालिकेची नगरसेविका होती. त्या वेळी करमाळा शहरातील महापुरूषाचे पुतळे सुशोभित करणे बाबत बहुमताने ठराव मंजूर करण्यात आला होता. त्या प्रमाणे शहरातील महापुरूषाचे पुतळे सुशोभित करण्यात आले. आता ऑगस्ट 2020 मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पुतळा सुशोभित करण्याचे काम झाले. सदरचे काम निकृष्ठ दर्जा चे करण्यात आले असल्याचे दिसून येत आहे. तर यासाठी वापरण्यात आलेले मटेरियल सुध्दा कमी दर्जाचे असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे करमाळा नगरपालिकेच्या बांधकाम अभियंता ऐवजी त्रयस्थ अभियंता मार्फत चौकशी करण्यात यावी. तसेच सदरचे काम गेली तीन ते साडे तीन वर्षे का करण्यात आले नाही ? सदर कामासाठी करमाळा नगरपालिकेने कोणत्या मुद्यावर मुदतवाढ दिली ?याबाबतची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या कडे केली आहे. या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री अजित पवार, तहसीलदार करमाळा व मुख्याधिकारी करमाळा यांना देण्यात आले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE