करमाळासोलापूर जिल्हा

शिक्षक दिनाचे खरे हक्कदार महात्मा फुले .-डॉ.श्रीमंत कोकाटे

करमाळा समाचार -संजय साखरे


…. मनुस्मृतीने घातलेली बंधने झुगारून देत महात्मा जोतीराव फुले यांनी भारतामध्ये शिक्षण व्यवस्थेचा पाया रुजविला. महात्मा फुले हे खरे शिक्षक दिनाचे हक्कदार आहेत असे मत जेष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी कोर्टी,येथील आयोजित महात्मा फुले स्मृतिदिन कार्यक्रम प्रसंगी केले.यावेळी निवृत्त कृषी अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते निळकंठ अभंग, गावचे सरपंच निलेश कुटे,कुकडीचे उपविभागीय अभियंता श्रीरंग मेहेर, सरपंच परिषदेचे अध्यक्ष डॉ. अमोल दुरंदे,कृ.उ. बा.स.संचालक अमोल झाकणे, सुभाष अभंग यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ ज्योती शिंदे या होत्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन व महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच निलेश कुटे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पुणे येथे कार्यरत राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रा. राहुल चव्हाण यांचा यावेळी गावकऱ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी आपल्या क्रांतिकारी मनोगतामध्ये कोकाटे यांनी समाजामधील रूढी ,अंधश्रद्धा, परंपरा, जाचक संकल्पना यांचा खरपूस समाचार घेत विद्येची खरी देवता ही सावित्रीबाई फुले आहे, स्वर्ग नरक, ज्योतिष भविष्य हे सर्व थोतांड आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा महात्मा फुले यांनी शोध घेऊन सर्वप्रथम जयंती साजरी करून छत्रपती शिवराय घराघरात पोहोचवले. याच छत्रपती शिवरायांना आदर्श मानत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना देशाला बहाल केली.

महात्मा फुले हे फक्त बोलके समाज सुधारक नव्हते तर ते कृतीत उतरवणारे विद्रोही विचारवंत उद्योजक व आधुनिक भारताचा पाया रचणारे खरे इंजिनियर होते. शुद्ध्राती शुद्रांना व स्त्रियांना नाकारलेला शिक्षणाचा अधिकार महात्मा फुलें व सावित्रीबाई फुले या दाम्पत्यांनी मिळवून दिला तेव्हा तेच खरे शिक्षक दिनाचे हक्कदार व विद्येचे देवता आहेत हा खरा इतिहास लोकांपुढे अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आणला पाहिजे असे यावेळी कोकाटे म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश अभंग, सचिन नवले यांनी केले तर प्रास्ताविक श्रीरंग मेहेर यांनी तर आभार निळकंठ अभंग यांनी मानले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE