दुधासह विविध प्रश्नाबाबत सोलापूर प्रहारचे शिष्ठमंडळ मंत्री कडुंच्या भेटीला
केम : संजय जाधव
अमरावती या ठिकाणी माननीय नामदार वंदनीय बच्चुभाऊ यांच्याशी सोलापूर जिल्ह्यासह सध्या महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करून त्यांच्या दुधाला योग्य तो भाव मिळवून द्यावा तसेच सोलापूर जिल्ह्यातील अनेक कारखानदारांनी गेल्यावर्षीची एफआरपी रक्कम शेतकऱ्यांना न देताच कारखाना चालू करण्याचा घाट घातला असून तो शेतकऱ्यांवर खूप मोठा अन्याय आहे त्यामुळे ऊसाची एफ आर पी रक्कम शेतकऱ्यांना पूर्णपणे आदा केल्याशिवाय महाराष्ट्र सरकारने कारखानदारांना गाळप परवाना देऊ नये याविषयी देखील भाऊंच्या सोबत चर्चा झाली.
भाऊंनी लवकरात लवकर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दुधाच्या बाबतीत दूध विकास मंत्री केदार साहेबांच्या सोबत तसेच उसाच्या एफ आर पी रकमेबाबत सहकारमंत्री पाटील साहेबांशी चर्चा करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेन असा शब्द दिला आहे अशी माहीती जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के यांनी दिली.

त्याच बरोबर सोलापूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात अनेक मुजोर अधिकाऱ्यांच्या चुकीच्या वागण्यामुळे शिक्षण क्षेत्राचे खूप मोठे नुकसान होत असून,अनेक खाजगी संस्थांकडून लोकांच्या परिस्थितीमुळे फी भरण्याची ऐपत नसताना सुद्धा पालकांना त्रास देऊन सक्तीने वसूल करून घेतली जात आहे हेदेखिल मंत्रीमहोदयांच्या कानावर घालण्यात आले.
याबाबत लवकरात लवकर जिल्ह्यातील जे भ्रष्ट शिक्षणाधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करून ज्या खासगी संस्थांकडून विद्यार्थी तसेच पालकांना त्रास होत आहेत या संस्थावर सुद्धा कारवाई करण्यासाठी शब्द भाऊंनी दिला.यावेळी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पाच टक्के अपंग निधी वाटपाबाबत सुद्धा चर्चा होऊन तो निधी लवकरात लवकर अपंगांना मिळावा.

यावेळी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पाच टक्के अपंग निधी वाटपाबाबत सुद्धा चर्चा होऊन तो निधी लवकरात लवकर अपंगांना मिळावा असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी सोलापूर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील शहराध्यक्ष अजित कुलकर्णी शहर संपर्कप्रमुख जमीर शेख शहर कार्याध्यक्ष खालीद मन्यार करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.