करमाळासोलापूर जिल्हा

भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्ताने एक अनोखा उपक्रम राबवण्याचे आवाहन

करमाळा – अमोल जांभळे

भारतीय स्वातंत्र्य महोत्सवाची 75 वर्षपूर्ती निमित्त ‘हर घर झंडा’ या उपक्रमाअंतर्गत करमाळा तालुक्यातील प्रत्यके घरांवर तिरंगा फडकवण्यात येणार आहे. यासाठीची जय्यत तयारी प्रशासनाकडून करण्यात येत असलेबाबतची माहिती तहसीलदार समीर माने व गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी दिली आहे. सदर कार्यक्रम महसूल प्रशासन,ग्रामविकास प्रशासन,पोलीस प्रशासन,कृषी विभाग व तालुक्यातील इतर सर्व प्रशासकीय विभागाच्या समन्वयातून यशस्वी करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने नागरिकांना तहसीलदार समीर माने यांनी केले आहे.

भारतीय स्वातंत्र्याला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मनात स्वातंत्र्याच्या आठवणी उजळून निघाव्यात तसेच स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात यासाठी ‘हर घर झंडा’ मोहीम राबविण्यात येत आहे. या उद्देशाने आपल्या वैभवशाली इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ‘ हर घर झंडा’ उपक्रम राबवण्यात येणार आहे.

लोकप्रतिनिधींच्या समन्वयाने सर्व शासकीय कार्यालयांनी जिल्ह्यात ‘हर घर झंडा ‘उपक्रम राबवण्यात यावा यासाठी जिल्हाधिकाऱी मिलींद शंभरकर यांनी सूचना केल्या आहेत.
प्रत्येकाने आपल्या घरावर झेंडा उभारत असताना ध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे.तसेच कोठेही राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

सदरचा ध्वज हा नाममात्र रक्कम रूपये 30 मध्ये नागरिकांना आपल्या ग्रामपंचायत मध्ये तसेच तहसिल कार्यालय , पंचायत समिती,नगरपालिका याठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.सदर ठिकाणी नागरिकांनी आपली नोंदणी तात्काळ करून प्रशासनास सहकार्य करावे.

‘हर घर झंडा’ हा कार्यक्रम सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, स्वस्त धान्य दुकानदार, महिला बचत गट, अंगणवाडी, विवीध स्वयंसेवी संस्था यांचे सहकार्य व समन्वयातून नागरिकांनी यशस्वी करण्यासाठी आपले योगदान स्वयंस्फूर्तीने द्यावे असे आवाहन तहसीलदार समीर माने, गट विकास अधिकारी मनोज राऊत, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांनी केले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE