अतिवृष्टीने उमरड येथे नाला बंडींग फुटून शेती व पिकांचे नुकसान
प्रतिनिधी / सुनिल भोसले
उमरड ता. करमाळा येथे काल झालेल्या पावसामुळे दोन नाला बंडींग फुटून शेतकऱ्यांची शेती व पिके वाहून गेली. यामध्ये प्रामुख्याने राजाभाऊ कदम यांच्या केळी, उडीद, ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले. विलास बदे यांचा ऊस वाहुन गेला, ज्ञानदेव बदे यांच्या केळी चे नुकसान झाले बाळू कदम यांच्या ऊसाचे नुकसान, सर्जेराव बदे यांच्या केळी चे नुकसान झाले. पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्याना अक्षरशा रडू कोसळले. हाता तोंडाशी आलेला घास हिरावून नेहल्याने शेतकरी पुरता मनातुन खचला आहे.

नुकसान झालेल्या शेतीचे व पिकांचे शासनाने तत्काळ पंचनामे करावेत व नुकसान भरपाई द्यावी.
नाला बंडींग फुटण्याचे कारण शोधुन दोशींवर कायदेशीर कारवाई करावी. गेली तीस वर्षामध्ये पहिल्यांदा नाला बंडींग फुटली आहे.
– राजाभाऊ कदम
जिल्हा अध्यक्ष बहुजन संघर्ष सेना