करमाळाकृषीसोलापूर जिल्हा

शेतकऱ्यांवरील संकट पिच्छा सोडेना ; आस्मानी नंतर लुटारूंमुळे अडचणी – विक्रेत्यासोबत रेकॉर्डिंग व्हायरल

करमाळा समाचार – दिलीप दंगाणे

पावसाबरोबरच रोगामुळे कांदा पिकाचे नुकसान केल्यानंतर आता कांदा बी खरेदीत शेतकऱ्याची लूट होता दिसत आहेत. पाऊस निर्यातबंदी आणी आता भाव वाढ यामुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे. कांद्याचे बी मिळत नाही. ठराविक दुकानांमध्ये कांदा बी मिळते. परंतु ते दुकानदाराच्या मनमानी बाजार भावा प्रमाणे शेतकऱ्याला खरेदी करावी लागते.

गतवर्षी गावरान कांद्याचे बी 1000 रुपये ते 1200 रुपये प्रति किलो दराने मिळायचे. आज रोजी 3600ते 4000 हजार रुपये प्रति किलोच्या पुढे गेले त्यातही बील दिले जात नाही. शेतकऱ्यांची मागणी पाहून त्या शेतकऱ्याना वाढीव भावात खरेदी करावी लागत आहे. मनमानी रेट मध्ये ठराविक दुकानांमध्ये काळाबाजार मिळत आहे. त्या कांदा बियाण्याची उगवन होईल का नाही याची गॅरंटी दिली जात नाही. एखाद्या शेतकऱ्याने बिल पावती मागितली तर दुकानदारांकडून कांदा बी नाही असे उत्तर जगाचा पोशिंद्याला मिळत आहे.

आज रोजी मार्केटमध्ये कांद्याला चांगला भाव आला पण त्याचा जगभर गाजावाजा झाला. परंतु कांदा बी मिळत नाही. कांदा बियाचे रेट गगनाला भिडले कांदा बी खरेदीत शेतकऱ्यांची होते लूट रासायनिक खताचे भाव गगनाला भिडले. मजुरी वाढली याचा कोण विचार करतय का? हे कोणाला दिसत नाही का? फक्त शेतकऱ्यांच्या बाजार भाव दिसतात? शेतामध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याची पिके रोगामुळे प्लॉटची प्लॉट नष्ट झालेले आहेत. याचा कोण विचार करतय का? आज कांद्याचे मार्केट वाढले परंतु शेतकऱ्यांच्या शेतातच कांदा नाही तर मार्केटला कोठून येणार याचा फायदा मोठ्या व्यापाऱ्यांना होणार. या व्यापाऱ्यांनी कांदा साठवून ठेवला आहे अशांना या कांदा बाजार भावाचा फायदा होणार शेतकरी मात्र राबराब राबून असाच मारणार की काय याकडे मायबाप म्हणाऱ्या सरकारचं पण लक्ष नाही असे शेतकरी गाऱ्हाणे करत आहे. आज रोजी शेतकऱ्याच्या शेतामध्ये उभे कांद्याची पिके रोगामुळे नष्ट झालेली आहेत.

शेतकऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी किमान त्याचे त्या पिकाचे पंचनामे तरी होणे काळाची गरज आहे. परंतु याकडे कोणी पाहायला तयार नाही. कृषी विभाग फक्त आणि फक्त बघ्याची भूमिका घेतय कृषी सहाय्यकांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यास सांगतय परंतु हे अधिकारी बांधावर तर सोडा त्यांची नेमणूक झालेल्या गावामध्ये सुद्धा फिरकत नाहीत. दोन दोन तीन तीन वर्ष ग्रामसभेला देखील हजर राहत नाहीत. शेतकरी मेळावे घेणे तर लांबच हे अधिकारी शेतकऱ्यांची काय संवाद साधणार हे शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करणार सज्जातील अधिकाऱ्यांना कोणत्या विभागाचा कोणता अधिकारी आहे ते माहीत नाही. तर शेतकऱ्यांना काय माहीत होणार या सर्व प्रकरणाकडे वरिष्ठांनी तात्काळ लक्ष देऊन शेतकऱ्यावर होत असलेल्या वाचा फोडावी.

कोरोनामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतमालाला बाजारभाव नाही. त्यामध्ये निसर्गाची साथ नाही. पिकांवर ती रोगराईचे साम्राज्य निर्माण झाले आहे. हाताला काम नाही तरी मायबाप सरकारने कोणतेही निकष न लावता कांदा पिकाचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित द्यावी.
माऊली गायकवाड, कांदा उत्पादक शेतकरी जिंती

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE