करमाळासोलापूर जिल्हा

उत्तरेश्वर जुनिअर कॉलेजचे लॉकडाउन काळात राज्यस्तरीय यश 

केम- संजय जाधव

श्री उत्तरेश्वर ज्यु. कॉलेज केमची विद्यार्थिनी कु. शुभांगी संतोष शिंदे या गुणवंत विद्यार्थिनीने राज्यस्तरीय गांधी दर्शन ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. लॉक डाउन काळात सध्या शाळा बंद पण अभ्यास चालू या उपक्रम अंतर्गत श्री उत्तरेश्वर जुनिअर कॉलेज केम याठिकाणी ऑनलाईन अभ्यासक्रमासोबतच विविध ऑनलाईन स्पर्धा उपक्रम राबविण्यात आले. याचाच एक भाग म्हणजे राज्यस्तरीय गांधी दर्शन ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत येथील कु. शुभांगी संतोष शिंदे या विद्यार्थिनीने महात्मा गांधी यांच्या जीवन दर्शनावर उत्कृष्ट सादरीकरण करून ऑनलाईन स्पर्धेत राज्यात दुसरा क्रमांक मिळवला.

एका वाडी -वस्ती वर राहणाऱ्या व अतिशय सर्व साधारण कुटुंबातील शुभांगी कडे साधा मोबाईल फोनही उपलब्ध नव्हता. ग्रामीण भागात राहुन इच्छा शक्ती आणि प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर शुभांगीने हे यश मिळविले.
ग्रामीण भागात राहुन देखील शहरी विद्यार्थ्यांशी स्पर्धा करीत राज्यस्तरीय यश मिळवता येते हे शुभांगीने सिद्ध करून दाखविले. शुभांगी शिंदे हिला प्रा. मालोजी पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. एक हजार रुपये व सन्मानपत्र असे या बक्षीसाचे स्वरूप आहे.

या यशाबद्दल मराठवाडा विभागप्रमुख प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, मा. आजीव सेवक श्री डि. व्ही. पाटील, प्र. प्राचार्य श्री रामेश्वर गवळी, शालेय समिती अध्यक्ष श्री मोहनराव दौंड, प्रा. गोपीनाथ शिंदे, प्रा. मालोजी पवार, प्रा. डॉ. मच्छिन्द्र नागरे, प्रा. संतोष साळुंखे, प्रा. संतोष रणदिवे, प्रा. अमोल तळेकर, उत्तरेश्वर हायस्कूल मधील सर्व शिक्षक बंधू -भगिनी , शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, सर्व विद्यार्थी – विद्यार्थिनी यांनी शुभांगी शिंदे हिचे कौतुक केले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE