एक तासाच्या प्रयत्नानंतर तीस फुट विहिरीतुन वनविभागाला कोल्हा वाचवण्यास यश
प्रतिनिधी सुनिल भोसले
पांडे येथील प्रध्यापक बुवासाहेब माने यांच्या विहिरीत सकाळी कोल्हा पडला असता माने यांच्या कडुन माहिती मिळताच पत्रकार दस्तगीर मुजावर व सुनिल भोसले यांनी लगेच वनपाल शिंदे मॅडम यांच्याशी संपर्क साधुन माहिती दिली असता त्यांनी वनरक्षक मजनू शेख व रघुनाथ रेगुडे यांना पांडे येथे पाठवले तर माने यांची विहीर अंदाजे तीस फुट खोल त्या विहिरीत शेख व रेगुडे यांनी मोठ्या कौशल्याने पकडण्यासाठी प्रत्यन केले.

परंतु कोल्हा चलाक प्राणी तो एक तास लपंडाव खेळत होता. परंतु शेख व रेगुडे यांनी जिद्दीने वाचवण्यासाठी प्रयत्न केले. दोन ते तीन वेळा टाकलेला फशा कोल्हाने दाताने बाजुला काढत तो लगेच पाण्यात उडी मारत होता. कोल्हा बावचळ्यासारखा करत होता. अंगावर धावून जात होता. परंतु एक तासाच्या प्रयत्नानंतर कोल्हा विहिरीतुन वर काढला आणि लगेच सोडुन दिला यावेळी बुवा साहेब माने दस्तगीर मुजावर , सुनिल भोसले याचे सहकार्य लाभले.
