करमाळासोलापूर जिल्हा

करमाळ्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक जगदाळे यांना राष्ट्रपती पोलिस शौर्य पदक ; राज्यपालांच्या हस्ते प्रदान

करमाळा समाचार 

गडचिरोली येथे कार्यरत असताना गट्टा फुलेबोंडी हद्दीतील भिमपुर जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षल चकमकीत एका नक्षलवाद्याचा कंठस्नान घालून मोठ्या प्रमाणात दारुगोळा व नक्षली साहित्य जप्त केल्या बद्दल करमाळ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. एन. जगदाळे यांना राष्ट्रपती पोलिस शौर्यपदक प्रदान करुन गौरवण्यात आले आहे. सदरचे पदक हे २०१६ मधील कामगिरी निमित्त देण्यात आले आहे.

एम. एन. जगदाळे हे गडचिरोली येथे कार्यरत असताना २८ जुलै २०१६ रोजी नक्षलविरोधी सप्ताहानिमित्त गडचिरोली जिल्ह्यातील गट्टा फुलबोंडी हद्दीतील भिमपुर जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवीत होते. यावेळी नक्षल चकमकीत एक नक्षलवादी ठार करण्यात जगदाळे यांना यश आले होते. या दरम्यान त्यांनी त्यांच्याकडून नक्षल साहित्य तसेच दारूगोळा जप्त केला होता.

जगदाळे यांनी आतापर्यंत चार नक्षल चकमक, दोन नक्षल आत्मसमर्पण, दोन भूसुरुंग स्पोटके जप्त करून नक्षल विरोधी पथक मध्ये द्वितीय प्रभारी अधिकारी व घाटे पोस्ट येथे प्रभारी अधिकारी म्हणून सहा वर्षाचा खडतर सेवा कालावधी पूर्ण केला आहे. त्यांना सदर उत्कृष्ट सेवेबद्दल वेगवर्धित पदोन्नती, आंतरिक सुरक्षा पदक, खडतर सेवा पदक तसेच पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह २०१९ देऊन गौरविण्यात आले होते.

दिनांक २६ जानेवारी २०२० रोजी राष्ट्रपती पोलिस शौर्य पदक जाहीर करण्यात आले. ते पदक राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते २१ मार्च २०२२ रोजी राजभवन मुंबई येथे पदक अलंकरण समारंभात प्रदान करण्यात आले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE