करमाळाताज्या घडामोडीसहकारसाखरउद्योगसोलापूर जिल्हा

तर दोन्ही कारखान्यातील विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासनाच्या ताब्यात द्यावा ..

करमाळा प्रतिनिधी सुनील भोसले

आदिनाथ बचाव कृती समितीची स्थापना करून शेतकरी व सभासद मिळुन संयुक्त ऊस उत्पादक परिषद बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आदिनाथ कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन शहाजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली संयुक्तपणे बैठक घेण्यात आली. यावेळी उपस्थित शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथआण्णा कांबळे, माजी संचालक डॉ पुंडे, माजी संचालक संतोष खाटमोडे, माजी संचालक दत्ता गिरमकर, ऊस उत्पादक डॉ गोरख गुळवे, सभासद अॅड लुणावत, ऊस उत्पादक उदयसिंग मोरे पाटील, ऊस उत्पादक सुहास गलांडे, ऊस उत्पादक सुपनवर आण्णा उपस्थित होते.

यावेळी बोलताना शहाजी देशमुख म्हणाले, 128 कोटी 26 लाख आदिनाथ कारखान्यावर शिखर बँकेचे कर्ज आहे. या कर्जापोटी आदिनाथ कारखान्याची 500 कोटी पेक्षा जास्त मालमत्ता असलेली इस्टेट गहाण ठेवली असल्याने सभासदांना मान्य नाही. आदिनाथ कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा असेल तर मकाई का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. जर कामगारांच्या पगारी व ऊस वाहतूक दाराचे पैसे देण्याचे असेल तर आदिनाथ व मकाई दोन्ही कारखान्यातील विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासनाच्या ताब्यात कारखाना देऊन कामगारांच्या पगारी द्यावेत. कारखान्याचे मालक सभासद आहेत म्हणून सभासदांना विचारत घेऊन निर्णय घेण्यात यावा असे शहाजी देशमुख म्हणाले.

डॉ पुंडे म्हणाले, जर वेळेवर साखर विक्री केली असती तर कारखान्यावर जप्तीची वेळ आली नसती. संचालक मंडळाच्या मनमानी कारभारामुळे कारखाना अडचणी आला. त्यामुळे कारखान्यावर 10 ते 12 कोटी व्याज वाढले. कामगारांचा पगारीचा प्रश्न हा चर्चा करून सुद्धा मिटवता आला असता.

ऊस उत्पादक शेतकरी सुहास गलांडे म्हणाले, ‌शरद पवार शेतकऱ्यांनचा जानता राजा आहे. सुरुवातीला आदिनाथ कारखान्यातील साखर पोत्याचे पुजन पवार साहेबांनी केले होते. तसच कारखाना भाडेतत्त्वावर न देता प्रशासनाच्या ताब्यात देऊन प्रशासनाने चालवावा असे आदेश देव्यात आणी साखर पोत्याचे पुजन आपणच करून कारखान्याला गतवैभव प्राप्त करावे.

अॅड लुणावत व सभासदांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणी शेवटी दशरथआण्णा कांबळे, शहाजी देशमुख, उदयसिंग मोरे पाटील, संतोष खाटमोडे, डॉ पुंडे सुहास गलांडे, अॅड लुणावत. डॉ गोरख गुळवे यांनी बैठकीत सर्व सभासद व शेतकरी बांधवांना बरोबर घेऊन दिनांक 6/11/2020 रोजी वेळ 11.30 वाजता करमाळा विश्रामग्रह येथे आयोजित करण्यात आली आहे तरी सर्व सभासदांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE