करमाळासोलापूर जिल्हा

प्रहारच्या वतीने सरकारच्या विरोधात थाली – टाली बजाव आंदोलन ; ना. बच्चु कडु यांचे आवाहन

करमाळा समाचार 

ना.बच्चुभाऊ कडू राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आवाहनानुसार खत दरवाढीविरोधात व तूर, मूग व उडीद विनाकारण आयात धोरणाविरोधात ताली बजाव, टाली बजाव आंदोलन करण्यात आले.

यावेळी शेतकरीचा एकजुटीचा विजय असो , मोदी सरकारचा धिक्कार असो, गरज नसताना कडधान्याचे आयात करणाऱ्या या सरकारचे करायचं काय खाली मुंडकं वर पाय, खत दरवाढ करणाऱ्या मोदी सरकारचे करायचे काय खाली मुंडकं वर पाय. अपना भिडू बच्चू कडू… या घोषणांच्या निनादात सर्व प्रहार सैनिकांच्या व शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रतिसादाने करण्यात आले.

भारतात 42 लाख टनाची आवश्यकता असुन 45लाख टन तुर उपलब्ध आहे. आवश्यकतेपेक्षा 3 लाख टन तुर उपलब्ध असताना केंद्र सरकारने ६ लाख टन तुर आयात कशासाठी केली? तसेच तुर, मुग, उडीद आयात पुर्णपणे खुली करुन धान्याचे भाव पाडण्यात येणार.

याकरीता सोलापूर जिल्ह्यातील करमाळा व माढा तालुक्यातील शहर व ग्रामीण भागामध्ये प्रहारचे ताली-थाली बजाओ आंदोलन संपन्न झाले. केंद्र शासनाच्या तुर, मुग, उडीद या धान्याच्या आयात धोरणा च्या विरोधात आज टेंभुर्णी येथे व सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सगळ्याच गावात चौकाचौकात संध्याकाळी नियोजित वेळेत(6:00वा.) covid-19 चे नियम पाळून आंदोलन संपन्न झाले.

या आंदोलनासाठी सोलापूर जिल्ह्याचे प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील प्रहार संघटना जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर करमाळा तालुका संपर्कप्रमुख सागर भाऊ पवार. सोनू मखरे विजय पवार आणि इतर सर्व प्रहार सैनिक या सर्वांच्या नेतृत्वाखाली ताली बजाव ताली बजाव आंदोलन करण्यात आले

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE