Uncategorizedकरमाळासोलापूर जिल्हा

राष्ट्रवादी 500 कुटुंबांची दिवाळी गोड करणार – झांझुर्णे

प्रतिनिधी – सुनिल भोसले

गेल्या सहा महिन्यांपासून सर्वसामान्य जनतेच्या हाताला काम नाही आता कोरोणाचे प्रमाण कमी होत असले तरी अजुन रोज मोलमजुरी करणाऱ्यांची गडी बसलेली नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्वसामान्य जनतेच्या दिवाळी सणाला थोडासा हातभार लागावा म्हणून मकाई कारखान्याचे संस्थापक आप्पासाहेब झाझुर्णे यांच्या संकल्पनेतून दिनांक १३/१२/२०२० रोजी किराणा मालाचे किट वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकर्ते यांनी दिली.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते म्हणाले, करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच मकाई सहकारी साखर कारखाना संस्थापक चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेस प्रांतिक सदस्य आप्पासाहेब झांझुर्णे यांच्या संकल्पनेतून रामवाडी ता करमाळा येथे गरजू लोकांना दिवाळी किटचे वाटप करण्यात येणार आहे तरी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येईल वाटप करण्यात येणाऱ्या किटमध्ये सॅनिटायझर, साबण, तसेच दिवाळी किराणा मालाचा समावेश असणार आहे.

या किटचे वाटप तहसीलदार समीर माने यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असुन या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा गोवर्धन चवरे पाटील,तालुका कार्याध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील, करमाळा शहराध्यक्ष शिवराज जगताप आदी उपस्थित राहणार असून परिसरातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित। राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य आप्पासाहेब झांझुर्णे यांनी केले आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE