E-Paperकरमाळाराजकीयसोलापूर जिल्हा

आता पदवीधर व शिक्षक मतदारसंघातुन करमाळ्याचीही दावेदारी ; महाराष्ट्रात सामाजीक कार्यात सक्रीय नाव आले समोर

करमाळा समाचार 

पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघातुन करमाळा कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती प्रा. शिवाजी ज्ञानदेव बंडगर हे इच्छुक असल्याने आता लढत रंगतदार परिस्थितीत जाऊन पोहचली आहे. बंडगर हे संपुर्ण महाराष्ट्रात सामाजीक कार्यात असल्याने त्यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडी बरोबर भाजपाला सुद्धा धोक्याची घंटा ठरु शकते.

करमाळा तालुक्यात कार्य करीत असताना कुटुंबातुन कसलीही राजकीय परिस्थिती नसताना सरांनी राजकारणात प्रवेश केला व अपेक्षीत नसताना मोठमोठ्या पदावरही विराजमान झाले आहेत. करमाळा तालुक्यातील छोट्याश्या ढोकरी गावातुन बंडगर यांनी सुरुवात केलेला माणुस आज विविध पदे भुषवत आहेत. आता त्यांनी पदवीधर मतदार संघातुन उडी घेतल्याने त्यांच्यामागे धनगर समाजाची ताकद तर उभा राहीलच त्याशिवाय विविध संघटनांचे बंडगर यांनी प्रतिनिधीत्व केल्याने त्यांना विजयाची संधी अधिक राहु शकते.

पदवीधर व शिक्षक मतदारसंघातुन करमाळा कधीच चर्चेत नव्हता पण आता बंडगर यांच्या रुपाने नुसता चर्चेत नाही तर शर्यतीत राहणारा उमेदवार मिळणार आहे. करमाळा तालुक्यातुन माजी आमदार नारायण पाटील, जिल्ह्यातुन मोहिते पाटील यांचे निकटवर्तीय तर शिवसेना व भाजपा नेत्यांची जवळीक मोठ्याप्रमाणावर असलेल्या बंडगरांना अपक्ष असले तरी पाठिंबा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बंडगर सरांच्या रुपाने करमाळ्याला आणखीन एक आमदार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कारकीर्द –

– सभापती-कृषी उत्पन्न बाजार समिती करमाळा, ता. करमाळा, जि. सोलापूर.
– अध्यक्ष-महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन व्यवसाय शिक्षण शिक्षक महासंघ.
– अध्यक्ष-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ नामांतर कृती समिती, महाराष्ट्र राज्य.
– सदस्य-महाराष्ट्र धनगर समाज एस. टी. आरक्षण कृति समिती, महाराष्ट्र राज्य.
सदस्य – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समिती सोलापूर विद्यापीठ .
– अध्यक्ष-संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती, करमाळा तालुका, जि. सोलापूर.
– अध्यक्ष-उजनी धरणग्रस्त संघर्ष समिती, करमाळा तालुका जिल्हा सोलापूर.
– संस्थापक अध्यक्ष-सरपंच संघटना, करमाळा तालुका, जि. सोलापूर.
– सरपंच-ढोकरी ता. करमाळा, जि. सोलापूर (२०००-२००२ व २०११-२०१५)

ता. करमाळा, जि. सोलापूर

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE