करमाळ्यातील जप्त वाळुची निलाव प्रक्रिया पुर्ण ; कोर्टीच्या व्यवसायीकाची सर्वाधिक बोली
करमाळा समाचार

करमाळा तालुक्यात जप्त केल्याचा वाळूचे निलाव बुधवारी पार पडला. या लिलावात कोर्टी येथील व्यवसायिक इक्बाल मलिक इनामदार यांनी सर्वाधिक बोली 560000 बोलुन वाळूचा निलाव ताब्यात घेतला आहे. यासाठी त्यांना अधिक ची 18% जीएसटी तर दहा टक्के जिल्हा खनिज प्रतिष्ठान सोलापूर यांना रक्कम द्यावी लागणार आहे.

तहसिल कार्यालय करमाळा याच्या ताब्यात असलेल्या १०५ ब्रास वाळु चा निलाव जाहीर करण्यात आला होता. या मध्ये तालुक्यातुन सहा अर्ज विक्री झाले पण चार जण निलावात सहभागी झाले होते. अनेक दिवसापासुन ताब्यात असलेल्या वाळु निलावाला मागील महिण्यात विक्री करण्याची परवानगी मिळाली पण घेणाऱ्या लोकांचा अधिक प्रतिसाद मिळाल्याचे दिसुन आले नाही.
सदरच्या निलावात करमाळा येथील अरुण जगताप, रवी जाधव यांच्यासह कात्रज येथील प्रज्योत पाटील व कोर्टीच्या इक्बाल इनामदार यांनी सहभागी झाले होते. यावेळी सर्वाधिक बोली इक्बाल इनामदार यांनी लावली त्यामुळे निलाव त्यांच्या नावे नोंदवण्यात आला. यावेळी निलाव प्रक्रियेचे काम तहसिलदार समीर माने, नायब तहसिलदार सुभाष बदे, मंगलसिंग घुसिंगे यांनी काम पाहिले.
