करमाळाकृषीताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

करमाळा बंदच्या अफवेमुळे उडीदाची आवक वाढली भाव पडले ! ; बंदला विविध संघटनांचा विरोध

प्रतिनिधी- करमाळा समाचार


करमाळा तालुक्यात बंद बाबत अफवा उठल्याने ग्रामीण भागातून शेतकरी मोठ्या प्रमाणावर हवालदिल झाला आहे. आहे त्या परिस्थितीत शेतीमाल घेऊन करमाळा इकडे येऊ लागल्याने आवक वाढलीआहे. पण बंद च्या नावाखाली आहे त्या भावात विकण्यास तयार होत आहेत. त्यामुळे उडीद आवक व भाव गडगडले आहेत त्यामुळे हा बंद कोणाच्या फायद्यासाठी पुकारला जातोय असा प्रश्न शेतकरी वर्गातून केला जात आहे. तर कालच करमाळ्यात विविध संघटनाच्या वतीने बंदला विरोध केल्याने बंद होईल का नाही याबाबत सभ्रम आहे.

दिनांक 10 ते 16 पर्यंत किराणा दुकानदारांनी करमाळा बंद असल्याबाबत घोषणा केली होती पण ती घोषणा फक्त किराणा व्यापाऱ्यांसाठी मर्यादित राहिली असून इतर व्यापाऱ्यांनी याला विरोध करीत आपली दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे तर कालच होटेलस यांच्यावतीने अधिकृत घोषणाही करण्यात आली आहे तर किराणा व्यापारी बंद वर ठाम आहेत

पण वैयक्तिक पुकारलेल्या बंदला वेगळे स्वरूप प्राप्त होऊन करमाळा बंद असल्याबाबत तालुक्यात अफवा पसरल्याने, शेतकरी मोठ्या प्रमाणावर हवालदिल झाला आहे. त्याचा प्रभाव शेतमाल विक्री वर होत आहे. उडीदाला सुरुवातीला सहा हजार ते साडे सहा हजार रुपयांपर्यंत मिळणारा भाव आता थेट पाच हजार रुपये पर्यंत नेऊन ठेवला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. शासनाने हमी भाव घालून दिलेल्या किमतीतच शेतीमाल खरेदी करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तर या संदर्भात बाजार समिती सभापती व संचालकांनी अधिकृत घोषणा करणे गरजेचे आहे. बंद’मुळे संभ्रम निर्माण झाल्याने शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. तर बंद नसल्याबाबत सभापती व संचालक मंडळाने अधिकृत घोषण करणे गरजेचे आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE