मानवता फाउंडेशनच्या रक्तदान शिबीरात १०१ जणांचे रक्तदान ; 26 जानेवारी निमित्ताने शिबीराचे आयोजन
जेऊर – करमाळा समाचार
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त करमाळा तालुक्यातील मानवता फाउंडेशनच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले या रक्तदान शिबीरात १०१ जणांनी रक्तदान केले.

जेऊर मधील स्वामी विवेकानंद पतसंस्थेच्या हॉल मध्ये १०१ जणांनी रक्तदान केले. यावेळी सोलापूरच्या अक्षय ब्लड बँकने रक्त संकलन केले.

मानवता फाउंडेशनचा हा उपक्रम होता सदरील रक्तदान शिबीरात मिळालेला प्रतिसाद उल्लेखनीय होता. या अगोदर १५ आॕगस्ट २०२० घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात २४२ जणांनी रक्तदान केले होते,
ह्या उपक्रमाबद्दल मानवता फाउंडेशनचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.
शिबीराला ज्येष्ठ व्यापारी किशोर काका राठोड, युवा नेते पै माणिक दादा पाटील यांनी रक्तदान करून शुभेच्छा दिल्या. पै अतुल भाऊ पाटील, नितीन खटके, अभय शेठ लुंकड यांनी शिबिराला सदिच्छा भेट दिली.
या शिबीरासाठी गणेश मोरे, अमित संचेती, प्रशांत मोरे, शलमोन केसकर, महादेव कुंभार, रणजीत सुर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.
तसेच कुणाला रक्ताची किंवा वैद्यकीय मदतीची गरज पडल्यास मानवता फाउंडेशन शी संपर्क करावा असे आवाहन त्यांनी केले आहे