करमाळासोलापूर जिल्हा

यामार्गाने करमाळ्यात कोविड केअर उभारण्यासाठी जमु शकतात एक कोटी रुपये ; भोसेचे माजी सरपंच सुरवसे यांनी सुचवला पर्याय

करमाळा समाचार 

करमाळा लालुक्यातील भोसे गावचे मा. सरपंच व राष्ट्रवादी काँग्रेस करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष माननीय श्री भोजराज (बापू) सुरवसे यांनी मा.श्री. आमदार संजय मामा शिंदे यांच्याशी चर्चा करुन घेतला कोविड सेंटर साठी योग्य निर्णय

सध्या दुसऱ्या लाटेतील कोरोनाचा शिरकाव थेट करमाळा तालुक्यातील गावखेड्यांपर्यंत येऊन ठेपला आहे. अनेक ठिकाणी धावाधाव करूनही उपचारासाठी बेड मिळणे मुश्कील बनले आहे. अशा परिस्थितीत करमाळा मतदारसंघातील एकूण 105 ग्रामपंचायात मधील 15 व्या वित्त आयोगातील 1 लाख रुपयांचा हप्ता सरकारकडे म्हणजे तहशीलदार आणि बीडीओ यांच्याकडे देऊन करमाळा शहरात कोविड सेंटर उभारावे, असे आवाहन भोसे गावचे मा. सरपंच आणि राष्ट्रवादी काँग्रेस करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष माननीय श्री भोजराज बापू सुरवसे यांनी केली आहे.

सध्या करमाळा तालुक्यांत कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून वाढत आहे. सध्या करमाळा शहरांत धावाधाव करताना कोरोना रुग्णांची हेळसांड होत आहे. अनेकांना ऑक्सिजन बेड मिळणे दुर्लभ झालेले आहे. गोरगरीब रुग्णांना तर कोरोना संसर्ग नसताना समोर मरण दिसत असल्याची अवस्था पाहायला मिळते आहे. अशावेळी धास्तावलेल्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी तहसीलदार आणि बीडीओ यांनी सोलापूर सीओ साहेबांची परवानगी घेऊन तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक (भाऊसाहेब) यांना परिपत्रक काढून एक लाख रुपये म्हणजे एक लाख याप्रमाणे सर्व ग्रामपंचायतिचे मिळून एक कोटी पाच लाख रुपये होतात अशी सर्व रक्कम एक समिती नेमून त्या समितीच्या स्वतंत्र खात्यावर वर्ग करण्याचा आदेश द्यावा सदर समिती मध्ये शाससकीय काही व्यक्ती आणि ग्रामपंचायत सरपंचांना सदस्य म्हणून घ्यावे सदर समितीचे अध्यक्ष तहशीलदार असतील आणि सचिव बीडीओ साहेब असतील कारण सदर पैस्यांचा वापर ग्रामपंचायतीला सध्या पेंडामीक परिस्थिती मध्ये करता येत नाही.

जेणेकरून त्या स्वतंत्र खात्याची रकक्कम वापरून एक 200 बेड चे सुसज्ज कोविड सेंटर उभारावे. करमाळा शहरातील महात्मा गांधी विद्यालय आणि गिरीधरदास देवी विद्यालय ही दोन महाविद्यालय ताब्यात घेऊन या दोन विद्यालयाचा सदर कोविड सेंटर साठी वापर करण्यात यावा. या सर्वांनी एकत्र येऊन तालुक्यातही नामांकित डॉक्टरांची टीम तयार करून कोरोनवरील जनतेचे उपचार करावेत. सदर मागणीचे पत्र देताना करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष व गुळसुडी गावचे मा. सरपंच दत्तात्रय अडसूळ, बोरगाव गावचे सरपंच विनय ननवरे तसेच भोसे गावचे सरपंच माननीय प्रा. डॉ. दिपक सुरवसे उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE