टाइम्स आयकॉन्स ऑफ हेल्थच्या वतीने डॉक्टर नितीन गाडे यांना पुरस्कार देऊन सन्मानित
प्रतिनिधी सुनिल भोसले
करमाळा तालुक्यातील केम येथील डॉक्टर नितीन गाडे हे पुणे येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटल मध्ये शुगर स्पेशलिस्ट डायबिटीस म्हणून गेले 2010 पासून काम करत आहेत त्यांनी शुगर डायबिटीसवर यशस्वीपणे उपचार करून रूग्णांना आयुष्यात सुखाने जगण्यासाठी योग्य औषधोपचार करून त्यांच्यामध्ये जोश निर्माण करून दिला. त्यामुळे पुणे येथील टाइम्स आयकॉन ऑफ हेल्थच्या वतीने पुणे येथे सन्मानित करण्यात आले.

या पुरस्काराचे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील डॉक्टर क्षेत्रातून व सामाजिक राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या कडुन पुस्काराचे कौतुक होत आहे केम येथील सुपुत्र डॉ नीतीन सुभ्रराव गाडे यांच्या पुस्काराची बातमी समजताच करमाळा तालुक्यातील माजी आमदार नारायण आबा पाटील सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे, करमाळा पंचायत समिती सभापती गहिनीनाथ ननवरे उपसभापती दत्तात्रय सरडे जिल्हा परिषद सदस्य बिभीषण आवटे युवा नेते अजित तळेकर भिमदल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील भोसले, यांनी डॉ. नितीन गाडे यांचे फोनद्वारे अभिनंदन केले.
यावर करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती शेखरजी गाडे बोलताना म्हणाले, डॉक्टर नितीन गाडे हे माझे मोठे बंधू आहेत. त्यांनी लाॅकडाऊनच्या काळामध्ये कोरोना महामारीमुळे मानवी जीवनावर मोठे संकट निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत आपल्या जीवाची बाजी लावून डॉ गाडे यांनी शुगर सेंटर पुणे हास्पिटलच्या माध्यमातून नागरिकांना चांगली सेवा देऊन अनेकांचे प्राण वाचविण्याचे काम केले तसेच करमाळा तालुक्यातील त्यांनी सर्व सहकाऱ्यांना फोनद्वारे कोरोनाबद्दल योग्य माहिती देऊन जनजागृती केली त्यामुळे त्यांच्या सानिध्यात जेवढे आमचे सहकारी मित्र आले त्यांनी कोरोनावर मात केला.
