माळशिरससोलापूर जिल्हा

जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने अकलुज येथे गरजु महिलांना शिलाई मशीन वाटप

करमाळा समाचार – अकलुज प्रतिनिधी

अकलूज ता माळशिरस जि सोलापूर येथील मराठा सेवा संघ , संभाजी ब्रिगेड ,जिजाऊ ब्रिगेड तर्फे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचा 423 वा जन्मोत्सव सोहळा व स्वामी विवेकानंद यांचा जयंती सोहळा जय शंकर उद्यान अकलूज येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ शितलदेवी मोहिते पाटिल होत्या
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार व स्वामी विवेकानंद यांचे प्रतिमा पुजन करण्यात आले.

अक्षता माने, हेमा सांगाडे यांनी जिजाऊ वंदना गायली,
प्रशासकीय अधिकारी शमा पवार मॅडम प्रांत अधिकारी अकलूज, मिसाळ साहेब अक्काताई माने, हेमा महाडिक,संगीता शिंदे,वंदना सांगडे,उषा नायर, जाधवताई व इतर महिला सदस्या यांचे उपस्थितीत गरजू महिलांना जिजाऊ ब्रिगेड तर्फे शिलाई मशीन वाटप करण्यात आल्या.


यावेळी कु अनुष्का चोरमले व शिवव्याख्याते शिवश्री दिगंबर मिसाळ यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष डॉक्टर रामचंद्र मोहिते ,सचिव राजेंद्र मिसळ , भारत सांगडे, वल्लभ सांगाडे,रवींद्र पवार,अजित माने तसेच कु आर्वी माने,उर्वी माने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारींनी परिश्रम घेतले.

सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वनिता कोरटकर यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रिया नागणे व आभार
हेमा मुळीक यांनी मानले सदर कार्यक्रमास मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड ,जिजाऊ ब्रिगेडचे पदाधिकारी व जिजाऊ प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE