ताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

अती वृष्टी मदतीचे तात्काळ वाटप करा अन्यथा आंदोलन करु- शाहुराव फरतडे

प्रतिनिधी सुनिल भोसले

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीतच्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीची दुसर्‍या टप्यातील रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा अन्यथा तीव्र आंदोलन करु असा इशारा शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

करमाळा तालुक्यातील ३६७३७ शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी २० कोटी २१लाखांची मागणी करण्यात आली होती त्यानुसार पैकी १४ कोटी तालुक्यासाठी प्राप्त झाली होती .या रकमेपैकी शेती पिंकासाठी ९कोटी ८०लाख तर घर पडझड, मयत, जनावरे, शेतजमीन नुकसान यासांठी ४कोटी ६१लाखाचे वाटप झाले आहे.

वास्तविक दोन हेक्टर क्षेत्र असलेल्या व तेहतीस टक्के नुकसान झालेल्या जिरायत शेतकऱ्यांना दहाहजार,तर फळ बागासाठी पंचवीस हजार मदत जाहीर केली आहे प्रत्यक्षात मात्र कोणाला,दोन हजार,कोणाला पाच हजार,अशीच मदत मिळाली चुकीचे पंचनामे झाल्याने अनेक शेतकरी नुकसान भरपाई पासुन वंचित राहीले आहेत.

नुकसानीस चार महिने उलटुन सुद्धा अनेक शेतकऱ्यांना फुटकी कवडी सुद्धा मिळाली नाही , निधी उपलब्ध असुन मदतीस चालढकल होत असल्याने शेतकऱ्यांत नारजी आहे. आठ दिवसांत जर शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा झाला नाही तर तहसील कार्यालयासमोर शिवसेना व शिवप्रताप प्रतिष्ठान च्या वतिने हालगीनाद आंदोलन करु आसा इशारा शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे यांनी दिला .या निवेदनावर सह्या माजी शिवसेना उप तालुकाप्रमुख विकास जराडे माजी विभाग प्रमुख अविनाश गाडे संतोष दुधे गौंडरे शाखा प्रमुख उत्तम हानपुडे शिवप्रतिष्ठानने संस्थापक अध्यक्ष शंभुराजे फरफडे आदी उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE