करमाळाक्राईमसोलापूर जिल्हासोलापूर शहर

कामगार देतो म्हणुन उमरडच्या एकाची चौदा लाखांची फसवणुक ; गुन्हा दाखल

करमाळा समाचार 

बारामती ॲग्रो साखर कारखाना यांच्याकडे ऊस वाहतुकीचा करार केल्यानंतर ऊस तोडणी कामगार पाहण्यासाठी जयसिंग रजसिंग माळचे नंदुरबार यांच्यासोबत करार केला. पण त्यांनी कामगार दिले नाहीत तसेच वेळोवेळी तब्बल १४ लाख रुपये घेऊनही फसवणूक केल्याप्रकरणी माळचे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार ८ मे २०२४ ते आजतागायत सुरू असल्याचे दिसून आले.

याप्रकरणी ज्ञानेश्वर तात्यासाहेब मारकड (वय २८) रा.उमरड ता. करमाळा जि सोलापुर यांनी करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून जयसिंग माळचे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात प्रथमवर्ग न्यायालय करमाळा येथे ट्रक्टर नं एम एच ४५ एफ ०७०८ व एम एच ४५ ए क्यु ४९०७ या ट्रक्टरने उसतोडी करण्यासाठी लागणारे कामगाराकरीता मुकदम जयसिंग माळचे याचे सोबत ऊसतोडी करण्याकरिता करण्याकामी एकुण २५ मजुर ऊसतोड जोड्या मिळाव्यात म्हणून १४ लाख ३० हजार ठरले व त्याची नोटरी केली.

politics

यानंतर मी महिन्यापासून वारंवार वेगवेगळ्या कारणातून वेगवेगळ्या रकमा संबंधित मुकादमास देत गेले. असे एकूण १४ लाख रुपये जमा झाले तरीही संबंधित मुकादम हा मजूर पाठवत नव्हता. त्यामुळे १६ ऑक्टोंबर २०२४ रोजी तक्रारदार हे माळचे यांच्या घरी गेले. यावेळी त्या ठिकाणी मुकादम व मजूर दोघेही मिळून आले नाहीत. त्यांना वारंवार फोन केला त्याने फोन उचलला नाही. तसेच त्यांचा आजुबाजुच्या परिसरात शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत.

त्यानंतर मारकड हे गावी निघुन आले. त्यानंतरही त्याला वारंवार फोन करत होते. परंतु त्यांने फोन उचलला नाही कोणत्याही प्रकारचा संपर्क केलेला नाही. त्यामुळे खात्री झाली की मुकादम याने फसवणुक केली आहे. पुढील तपास करमाळा पोलिस करीत आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE