करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

नगरपरिषद निवडणुकीत रंगत वाढली ; शहर विकास आघाडीत धडकी वाढवणारे प्रवेश

करमाळा समाचार

 

सुरुवातीला मोठ्या दोन गटात तुल्यबळ लढत होईल असे वाटत असताना सावंत घटाने मुसंडी मारत करमाळा शहर विकास आघाडी प्रकाश झोतात आणली असून आघाडीमध्ये रोज वेगवेगळ्या भागातून प्रवेश सुरू आहेत. त्यामुळे शहर विकास आघाडी जोमात असल्याची दिसून येत आहे. विशेष म्हणजे दोन्ही गटाकडून बाहेर पडलेले कार्यकर्ते हे शहर विकास आघाडीकडे जात आहेत. त्यात हिंदू- मुस्लिम सह इतर समाज बांधवांचाही सहभाग आहे.

करमाळा शहरात जगताप गट व बागल गट तुलनेने मोठे असल्याने या दोन गटातच लढत होईल अशी शक्यता दिसून येत होती. परंतु सावंत गट ठाम भूमिका घेत मैदानात उतरल्याने आता सावंत गटाने ज्या आघाडीची निर्मिती केली त्या आघाडीला प्रतिसादही तसाच मिळत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या मागे कोणताही गॉडफादर नसताना सावंत गटाने घेतलेली मुसंडी ही कौतुकास्पद मानली जात आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये सावंत गट राष्ट्रवादीच्या बाजूने असला तरी आमदार व खासदार दोघेही समोरुन त्यांच्या सोबत नाहीत. तर मागील वेळी सारखे सावंत यांनी स्थानिक गटावर निवडणूक लढवत असताना शहर विकास आघाडी उभा ठाकली आहे. या आघाडीमुळे जगताप व सावंत यांचे मतदार एकच प्रकारचे असल्याने जगताप गटाला फटका बसेल की मागील वेळी ज्या कन्हैयालाल देवी सोबत राहून देवींच्या नगराध्यक्ष पदासाठी प्रयत्न करीत होते त्या देवींना फटका बसेल हे दोन प्रश्न आहेत.

सावंत गटासोबत शहर विकास आघाडीमध्ये शिवसेनेच्या शहर व तालुका आघाडीने पाठिंबा देत सहकारी होण्याचे ठरवले. याशिवाय सुतार गल्ली येथील कट्टर हिंदुत्ववादी मानले जाणारे रजपूत समाजानेही सावंत यांना पाठिंबा दिला आहे. तर सावंत गटाच्या बालेकिल्ल्यात मुस्लिम समाज पहिल्यापासूनच त्यांच्या पाठीशी आहे तर सर्वसामावेशक भूमिका असल्याने व स्थानिक आघाडी असल्याने पक्ष सोबत जाण्याऐवजी स्थानिक आघाडी सोबत जाण्यासाठी इतर समाजबांधवही उत्सुक आहेत. त्यामुळे हिंदू-मुस्लीमारसह इतर घटक सावंत यांना जोडत असल्याने सध्या शहरी विकास आघाडीची जोरदार मोर्चे बांधणी सुरू असून त्यांचेही नाव चर्चेत आले आहे.

ज्या पद्धतीने प्रभाग एक व दोन मध्ये सावंत गटाची पकड मजबूत आहे. त्याच पद्धतीने इतर ठिकाणी पकडत मजबूत नसली तरी प्रत्येक प्रभागातून त्यांना प्रतिसाद मिळत आहे. तिन्ही गटाची विभागणी होऊन त्याचा कितपत परिणाम हा मतदानावर होईल यावर सावंत गट व शहर विकास आघाडीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. त्यामुळे पहिल्या दोन प्रभागासह इतर प्रभागातही सावंत गटांनी जोर लावणे गरजेचे असल्याचे दिसते.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE