स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राजुरीत आजी-माजी सैनिकांचा सन्मान सोहळा
करमाळा समाचार- संजय साखरे
राजुरी तालुका करमाळा येथील ग्रामपंचायतीच्या वतीने देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला. त्यानिमित्तानं गावातील देशसेवा करीत असलेले जवान व सेवानिवृत्त जवान व त्यांच्या आई-वडिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी देशाच्या सीमेवर आपले प्राण तळहातावर घेऊन देशाची रक्षा करणारे शूर वीर जवान, सेवानिवृत्त जवान व त्यांचे माता-पिता यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी देश सेवा करून सेवानिवृत्त झालेले मेजर अनिल साखरे, हनुमंत जगताप, लालासाहेब जाधव, निवृत्ती जाधव व देश सेवा करीत असलेले वीर जवान विनोद जाधव,दिगंबर शिंदे, राहुल साखरे,विनोद मोरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच डॉक्टर अमोल दुरंदे ,ग्रामसेवक गलांडे भाऊसाहेब यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
