बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनी स्वतः रक्तदान करीत आपला सहभाग

करमाळा समाचार 

श्री मकाई कारखान्याला रक्तदान शिबीरास उस्फुर्त प्रतिसाद
करमाळा- श्री मकाई कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांच्या वाढदिवसानिमित्त दादाश्री फाउंडेशन आणि मकाई कारखान्याच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या रक्तदान शिबीरास 175 रक्तदातांनी उस्फुर्त प्रतिसाद नोंदवला. कोरोना काळात असणारी रक्ताची कमतरता लक्षात घेत हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

या रक्तदान शिबिरामध्ये बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनी स्वतः रक्तदान करीत आपला सहभाग नोंदवला. या रक्तदान शिबीराला रक्तदातांनी आपला सहभाग नोंदवत मोठ्या प्रमाणात उस्फुर्त सहभाग नोंदवला आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने १०३० विविध वृक्षाचे वृक्षारोपण ही करण्यात आले. यासोबतच ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक्टरला रिफ्लेक्टर बसवण्यात आले. मकाई कारखाना आणि दादा फाउंडेशनच्या कार्यक्रम ही संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल, बाजार समितीचे सभापती शिवाजी बंडगर, यशकल्याणी सामाजिक संस्थेचे गणेश करे, कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन बाळासाहेब पांढरे, संचालक रामभाऊ हाके, महादेव गुंजाळ, संतोष देशमुख, दत्तात्रय गायकवाड, बापूराव कदम, नंदकिशोर भोसले, महादेव सरडे, आनंद ढेरे, शहाजी माने, दादाश्री फाउंडेशनचे दत्ता काकडे, माधव जाधव, कार्यकारी संचालक हरिश खाटमोडे, माजी संचालक मोहन गुळवे, सुनिल तानवडे, गणेश झोळ, रेवणनाथ निकत, साधना खरात यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.

दादाश्री फाउंडेशन आणि मकाई कारखान्याने या कोरोनाच्या काळात घेतलेले रक्तदान शिबीर सामाजिक जाण देणारे आहे. यासोबतच त्यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला. आपण स्वतः रक्तदान करुन यामध्ये सहभाग नोंदवला. वाढदिवसाचे निमित्त असले तरी झालेला हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे… रश्मी बागल, बागल गटाच्या नेत्या

DMCA.com Protection Status
error: Don\'t try to copy. Content is protected !!