पोलिस असल्याचे सांगुन केमच्या व्यापाऱ्याला मारहाण ; दोघांवर गुन्हा दाखल
करमाळा समाचार
पोलीस असल्याचे सांगून केम येथील कापड व्यापाऱ्याला दोन इसमांनी मारहाण करून खिशातून 19 हजार 500 रुपये काढून घेतले. या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार केम येथे 11 जून रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी राहुल नकाते यांनी तक्रार दाखल केली आहे.

राहुल हे केम येथील कपड्याचे व्यापारी आहेत ते छोट्या-मोठ्या दुकानदारांना क्रेडिटवर कापड कापड देतात. यातून त्यांची बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील मनोज बावडकर यांच्याशी ओळख झाली. 11 जून रोजी त्यांचे नातेवाईक आनंद निनाळे हे एका सहाकाऱ्यासोबत तोंडाला रुमाल बांधून आले. त्यांनी पाठीमागून पकडले.

त्यावेळी का पकडले असे विचारले असता त्यांनी पोलीस आहे तू चल असे सांगून बसवेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रेल्वे पुलाजवळ घेऊन गेले. त्यानंतर तोंडात चापट मारून खिशातील एकोणीस हजार पाचशे रुपये काढून घेतले व तक्रार केल्यास मारून टाकू अशी धमकी दिली.