करमाळासोलापूर जिल्हा

वीजांच्या गडगडासह झालेल्या पावसात वीज पडुन एक गाई ठार

करमाळा समाचार -संजय साखरे

करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागात आज विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. तालुक्याच्या पश्चिम भागातील कात्रज येथील महेश तानाजी लकडे यांच्या गाईच्या अंगावर वीज पडून गाय जागीच ठार झाली आहे.

आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पावसाने विजेच्या कडकडाटासह हजेरी लावली. लकडे यांची गाई घरासमोर झाडाखाली बांधली होती .त्या झाडावर वीज पडून गाय ठार झाली आहे. लकडे हे कात्रज मधील अल्पभूधारक शेतकरी असून त्यांचा दुधाचा व्यवसाय आहे.

सदर गाईची किंमत 80 हजार रुपये असून महसूल विभागाने तात्काळ पंचनामा करून आपल्याला भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE