करमाळासोलापूर जिल्हा

सावडीत भक्तीचा महापूर, नामवंत कीर्तनकार बजावणार सेवा. विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनांचाही कार्यक्रम

करमाळा समाचार -संजय साखरे


श्री हिरा भारती महाराज अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने सावडी तालुका करमाळा येथे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आपली सेवा बजावणार असून या निमित्ताने सावडीत भक्तीचा महापूर पाहायला मिळणार आहे.

सावडी येथील अखंड हरिनाम सप्ताहाचे हे ३६ वे वर्षे असून करमाळा तालुक्यातील सर्वात मोठ्या या धार्मिक सोहळ्याची सुरुवात शुक्रवारी दिनांक ५ ऑगस्ट रोजी ह.भ. प मनोहर महाराज बेलापूरकर यांच्या कीर्तनाने होणार आहे. त्यानंतर ह. भ. प ज्ञानेश्वर महाराज कोठुळे, ह. भ. प ज्ञानेश्वर महाराज पठाडे, ह. भ. प बाळू महाराज गिरगावकर, ह. भ. प दत्तात्रय महाराज पवार ,ह .भ .प पुरुषोत्तम महाराज पाटील, ह. भ .प रामराव महाराज ढोक, ह.भ. प संजय महाराज पाचपोर आपली सेवा बजावणार आहेत.तर रामायणाचार्य ह.भ.प माधव महाराज रसाळ यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे.


त्याचबरोबर बुधवार दिनांक १० ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील प्रसिद्ध भारुडकार ब्रम्हदेव महाराज कनेरकर यांच्या रंगीत संगीत भारुडाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच १० ऑगस्ट रोजी आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन ही करण्यात आले आहे. तसेच या सप्ताहाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला असून यामध्ये कथाकथन, निबंध स्पर्धा व वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी करमाळा तालुक्यातील शैक्षणिक, सामाजिक,व्यावसायिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.

तरी या वरील सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आव्हान समस्त सावडी ग्रामस्थ व सप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE