करमाळा गुळसडी रस्त्यावरील पांडवड्यात वाहुन गेलेल्या व्यक्तीचे मृत शरीर मिळाले
करमाळा समाचार
करमाळा गुळसडी रस्त्यावर खंडागळे वस्ती परिसरात वाहुन गेलीली व्यक्तीचे मृत शरीर मिळुन आले आहे. काल रात्री मोठा पाऊस असल्याने शोधकार्य करता आले नव्हते. पण सकाळी पाऊस थांबल्यामुळे पुन्हा शोध सुरु झाला त्यावेळी रस्त्यापासुन जवळच झाडाला अडकलेले मृत शरीर मिळुन आले आहे.

त्या परिसरात काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील काही मजूर येऊन राहत आहेत. त्यातील दोघे पाऊस सुरू होण्यापूर्वी घराबाहेर पडले होते. पण माघारी जात असताना पावसाचा अंदाज आल्याने एक जण माघारी फिरला. पण वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने एक जण तसाच पाण्यात पुढे गेला. काही कळण्याच्या तो त्या पाण्यात वाहून गेला सदरचे पाणी वेगवान असल्याने तो त्याला घेऊन गेले. संबंधित लोकांनी त्या ठिकाणी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केला. पण पाण्याचा वेग व पाऊस असल्याने त्याचा शोध लागू शकला नाही.

अशोक रामदास जाधव रा. बीड असे त्या तरुणाचे नाव आहे. त्याचे मृत शरीर झाडाला अडकलेले मिळुन आल्या नंतर परिवाराचे लोकांना दु ; ख अनावर झाले. यावेळी सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रकाश भुजबळ, हवालदार रंदवे, कावळे, पोलिस पाटील धनाजी अडसुळ हे उपस्थित होते. तर त्या मृत शरीराला बाहेर काढुन शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. पुढील कार्यवाही सुरु आहे