करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

दुधात भेसळ – देवळाली येथे कारवाई ; दोघांवर गुन्हा दाखल

करमाळा समाचार

दुधामध्ये काहीही भेसळ करण्यास परवानगी नसताना त्यामध्ये वे परमिट पावडरचा वापर करून भेसळ केल्याप्रकरणी देवळाली ता. करमाळा येथील दोघांवर अन्न व औषध प्रशासन सोलापूर यांच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्याकडे मिळून आलेला वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला आहे.

सदरची कारवाई २६ ऑक्टोबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास मे हँटसन ॲग्रो प्रा. लि. देवळाली येथे करण्यात आली. भारत तानाजी चोपडे हे सदर पेढीचे व्यवस्थापक व त्यांचा मामे भाऊ निखिल कानगुडे असे दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नंदनी हिरेमठ (वय ३९) अन्नसुरक्षा अधिकारी सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अन्न व औषध प्रशासन विभाग श्रीमती हिरेमठ यांना गोपनीय माहिती मिळाली होती की देवळाली येथील पेढी मध्ये भेसळ केली जात आहे. यावेळी २६ ऑक्टोबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास श्रीमती हिरामठ यांनी मे. हँटसन ॲग्रो प्रा. लि. देवळाली येथे तपासणी कामी भेट दिली. यावेळी तपासणी दरम्यान पेढी मध्ये आणलेले दुधापैकी ३०० लिटर दूध हे निखिल कानगुडे यांच्याकडून आणले असल्याचे सांगितले, त्यानंतर त्या दुधात भेसळ आल्याचा संशय आल्याने कानगुडे यांच्या घरी जाऊन पाहणी केली, त्यावेळी त्यांच्या घरी वे परमिट पावडरचा ४० किलो इतका साठा आढळून आला.

यावेळी त्यांच्याकडे विचारणा केली असता दुधामध्ये एसएनएफ वाढवण्याकरता वापरत असल्याचे सांगितले. तसेच दररोज अंदाजे तीनशे लिटर दूध हे देवळाली येथील कलेक्शन सेंटर कडे देण्यापूर्वी दुधात व्हे पावडर मिसळत असल्याचे कबूल केले. याबाबतची माहिती त्यांचे मामेभाऊ भारत चोपडे यांना असल्याचीही कबुली त्यांनी दिल्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी त्यांच्या ताब्यातील ४७३ लिटर दूध रुपये १५ हजार ६०९ व व्हे परमिट पावडर ३९ किलो किंमत ४हजार ९९२ असे एकत्रित २० हजार ६०१ साठा जप्त करून नष्ट करण्यात आला आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE