अखंड हरिनाम सप्ताहात सावडीत दातृत्वाची मांदियाळी
करमाळा समाचार -संजय साखरे
गेल्या 36 वर्षाची अनोखी परंपरा असलेल्या सावडी तालुका करमाळा येथील श्री हिरा भारती महाराज अखंड हरिनाम सप्ताहाचे निमित्ताने सावडी ता. करमाळा येथे अनेक दात्यांनी आपले दातृत्व दाखवून दिले आहे.

गेल्या सहा दिवसापासून प्रत्येक दिवशी येथे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आपली सेवा बजावत असून आज या सप्ताहाच्या निमित्ताने रामायणाचार्य ह. भ. प रामराव महाराज ढोक यांचे कीर्तन होणार आहे. या कीर्तनकारांची सेवा सावडीचे पुणे स्थित उद्योजक श्री भाऊसाहेब भागवत येदवते यांच्यामार्फत होत असून काल्याच्या महाप्रसादाची सेवा सावडीचेच पुणे स्थित उद्योजक सचिन भगवान देशमुख यांच्यामार्फत होणार आहे.
यानिमित्ताने विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून काल झालेल्या विविध शालेय स्पर्धेसाठी गटशिक्षणाधिकारी पाटील साहेब,ऍड. नागेश जायभाय, सचिन देशमुख, भाऊसाहेब यदवते यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

यानिमित्ताने शाळेत दूरवरून येणाऱ्या मुलींसाठी चंद्रकांत जायभाय, निलेश एकाड, राजेंद्र एकाड, भाऊसाहेब यदवते , सचिन देशमुख व भाऊसाहेब शेळके यांच्यामार्फत मुलींना मोफत सायकली देण्यात आल्या. याशिवाय शाळेत रंगरंगोटी अतुल राजे भोसले यांच्यामार्फत तर ग्रंथालयासाठी ऍड जायभाय यांनी पुस्तके दिली आहेत.
या सर्वांचे आभार कोर्टी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री देवकाते सर यांनी मानले.