करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यातील प्रलंबित प्रश्नाविषयी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

करमाळा समाचार 

तालुक्यातील भूसंपादन, पुनर्वसन व उजनी धरणग्रस्तांना पर्यायी जमिनीचे वाटप करणे आदी प्रलंबित विषयावरती करमाळा तालुक्याचे आ. संजयमामा शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बैठक घेतली.

या बैठकीमध्ये तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन योजना व त्या अंतर्गत सुरु असलेली भूसंपादनाची कार्यवाही , कुकडी प्रकल्प व त्याअंतर्गत सुरू असलेली भूसंपादनाची कार्यवाही यावर सविस्तर चर्चा झाली . कोळगाव प्रकल्पांमध्ये तालुक्यातील भालेवाडी ,हिवरे, मिरगव्हाण आदी गावातील भूसंपादनाचे प्रस्ताव यावर ती चर्चा होऊन ते मार्गी लावण्याची सूचना करण्यात आली.

politics

उजनी धरणग्रस्तांना पर्यायी जमिनीचे वाटप करणे याबाबत पुनर्वसन उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात स्वतंत्र बैठक होऊन प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन त्यावर त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आ. संजयमामा शिंदे संपर्क कार्यालयाच्या वतीने आवाहन करण्यात आले होते, यानुसार कार्यालयात जमा झालेले पर्याय जमिनींचे अर्जवरती यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

भूसंपादनाचा वाढीव मोबदला मिळणे या अंतर्गत न्यायालयामध्ये प्रविष्ट असलेली प्रकरणे तसेच जेऊर ते जिंती रस्त्याचा उमरड ते मांजरगाव या भागातील रस्त्यासाठी संपादित जमिनीचा मोबदला अद्याप मिळालेला नाही या प्रलंबित प्रश्नावरती चर्चा करण्यात आली .

सदर बैठकीस सुजित बागल ,राजेंद्र धांडे, आप्पासाहेब उबाळे यांचेसह अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्रीमती चव्हाण, कुर्डूवाडी प्रांत अधिकारी ज्योती कदम, उपजिल्हाधिकारी अरुण गायकवाड, जिल्हा परिषदेचे सार्वजनिक बांधकाम चे कार्यकारी अभियंता श्री माने, तसेच सिना कोळेगाव प्रकल्प कार्यकारी अभियंता श्री हरसुरे, दहिगाव उपसा सिंचन योजनेचे उप अभियंता सी .ए. पाटील, आदी उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE