परप्रांतीय शेतमजुराचा शेतातील सामानावर डल्ला ; विश्वासघात करुन पसार
करमाळा समाचार
शेतातील सामानाची सुरक्षा देखभाल करण्यासाठी ठेवलेल्या परप्रांतीय मंजुराने मालकाच्या सामानावरच डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हिवरे येथील शेतकरी प्रकाश विठ्ठल ओहोळ वय 65 वर्षे रा. हिवरे ता. करमाळा जि. सोलापुर हल्ली रा. ओंकार बंगला, श्री कॉलनी, सव्र्हे नं 40, देहु रोड, पिंपरी चिंचवड ता.हवेली जि.पुणे यांच्या शेतीतील तब्बल पन्नास हजारांचा मुद्देमाल घेऊन पसार झाला आहे.

ओहोळ यांची मौजे हिवरे येथे 24 एकर शेती असुन ती करण्याकरीता त्यांनी मार्च 2023 रोजी पासुन दशरद अरकत बलेरा रा. यलदा(वेळोडे) ता.चोपडा जि. जळगाव मुळ ता. शेंडवा जि. बिडवाणी राज्य मध्य प्रदेश यास दरमहा 10,000/- रू पगाराने शेतीकामासाठी ठेवले होते.

दिनांक 11/07/2023 रोजी दुपारी 03:00 वाचे सुमारास फोन वरुन दशरद अरकत बलेरा याला फोन लावला असता त्याने मला सांगितले की, मी करमाळा येथे आलो आहे माझे काम झाले की परत जातो’ त्यानंतर ब-याच वेळा फोन लावला असता त्याने त्यांचा फोन बंद केला.
दिनांक 20/07/2023 रोजी सकाळी 09. वाचे सुमारास मौजे हिवरे ता. करमाळा येथील शेतामध्ये पोहचलो. त्यावेळी मी आमचे शेतामधील दशरद अरकत बलेरा यांचा व घराची पाहणी केली असता काही समान दिसुन आले नाही. तेव्हा खात्री झाली की, घरातील सामान दशरद याने संमती शिवाय, मुद्दाम लबाडीने चोरी करुन नेले आहे.
चोरीस गेलेल्या मालाचे वर्णन खालील प्रमाणे :1) 23,800/- रु एक 7.5 एच पी ची इलेक्ट्रीक पाणबुडी मोटार जुवाकिअं 2) 7,000/- रु एक 5 एच पी ची इलेक्ट्रीक पाणबुडी मोटार जुवाकिअं 3)5,000/- एक सॅमसंग कंपनीचा टी व्ही जुवाकि अं 4) 6000/- 6फुट लांबीचे एकुण 13 पत्रे 41,800/- एकुण.