करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

राजकीय दबावामुळे मकाई व कमलाई वर कारवाईसाठी टाळाटाळ

प्रतिनिधी करमाळा

मकाई, कमलाई, घागरगाव साखर कारखान्यांनी उसाची बिले शेतकऱ्यांना द्यावीत म्हणून बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढला मोर्चा चालू असताना करमाळ्यामध्ये पाऊस चालू होता.

यावेळी राजाभाऊ कदम म्हणाले मकाई आणि कमलाई कारखान्यावरती आर आर सी प्रमाणे कारवाई करण्याचे आदेश साखर आयुक्त यांनी तहसीलदारांना दिलेले आहेत. मात्र दोन महिने झाले तहसीलदार यांनी मकाई व कमलाई कारखान्यावरती काय कायदेशीर कारवाई केली नाही. जिल्हाधिकारी यांना दोन्ही कारखान्याची साखर जप्त करून तिचा निलाव करून शेतकऱ्यांच्या उसाची बिले देण्याचे आदेश साखर आयुक्त यांनी दिलेले आहेत. मात्र राजकीय दबावापोटी मकाई कमलाई साखर कारखान्यावर कारवाई होत नाही. म्हणून शेतकऱ्यांना बिले मिळत नाहीत असा आक्षेप राजाभाऊ कदम यांनी घेतला.

मोर्चेकर्‍यांचे निवेदन स्वीकारायला नायब तहसीलदार निकम साहेब आले. मकाई कमलाई साखर कारखान्याचे प्रतिनिधी आले परंतु मोर्चेकर्‍यांचे समाधान झाले नाही. म्हणून तहसील कचेरी समोरून उठणार नाही असा पवित्रा राजाभाऊ कदम यांनी घेतला. अखेर नायब तहसीलदार निकम यांनी कमलाई मकाई कारखान्यांना कारवाईबाबतच्या नोटिसा काढलेल्या आहेत असे लेखी पत्र दिले मकाई कारखान्याने पंधरा दिवसात उसाची बिले काढणार असलेचे चेअरमनच्या सहीने लेखी पत्र दिले व कमलाई कारखान्याने तहसीलदार यांनी आमच्यावरती कारवाई करून साखरेचा निलाव करून शेतकऱ्यांचे पैसे देण्याची व्यवस्था करावी अशा पद्धतीचे लेखी पत्र दिले.

यावरही राजाभाऊ कदम व शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही जर पंधरा दिवसात पैसे मिळाले नाहीत तर साखर आयुक्ताच्या समोर धरणे आंदोलन करणार असा निर्णय घेतला व शेतकऱ्यांच्या वतीने कोर्टामध्ये याचिका दाखल करण्याचाही निर्णय राजाभाऊ कदम यांनी शेतकऱ्याच्या सहमतीने घेतला .

यावेप्रसंगी राष्ट्रवादीचे राजकुमार देशमुख, प्रहारचे संदीप तळेकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे अंगद देवकते, बौद्ध महासभेचे सुहास ओहोळ ,शाहीर शिवाजी कांबळे , श्रीकांत मारकड यांची भाषणे झाली. यावेळी दत्ता गव्हाणे लालासाहेब काळे सुंदरदास काळे संदीप मारकड रवी घोडके विष्णू रंधवे अंगद लांडगे आप्पा भोसले रमेश भोसले कालिदास कांबळे मच्छिंद्र गायकवाड आधी बहुसंख्या कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE