मांगी रोडला अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका कार मध्ये आढळला मृतदेह ; घातपाताचा संशय
करमाळा समाचार
अहमदनगर टेंभुर्णी महामार्गावर मांगी रस्त्याने असलेल्या आयटीआय जवळ रस्त्यापासून शंभर फूट अंतरावर एक अनोळखी कार उभी होती. त्यामध्ये एक मृत शरीर आढळून आले आहे. ते अर्धवट जळलेले असून पुरुषाचे ते शरीर आहे. सदर ठिकाणी करमाळा पोलीस पोहचले असून पुढील माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

मागील दोन दिवसापासून सदरची कार एम एच १५ – ८००६ स्वीफ्ट कार त्या ठिकाणी उभा असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. येता जाता सदर कार दिसून येत होती. परंतु कोणाला त्याची कल्पना आलेली नव्हती. आज अखेर संशय आल्याने काहीजणांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले. एका जणांचे मृत शरीर संबंधित कार मध्ये मिळून आले आहे. त्या कारचे शीट जळालेले होते. तर संबंधित व्यक्ती ही अर्धवट जळालेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरण काय आहे याचा तपास पूर्ण झाल्यावरच लक्षात येणार आहे .

संबंधित व्यक्तीने स्वतःहून आत्महत्या केली आहे का त्याला कोणी तिथे आणून मारून टाकले आहे. त्याचा तपास करावा लागणार आहे. सध्या प्राथमिक अंदाज लावता येत नसणार तरी पोलीस व इतर यंत्रणा सर्व त्या ठिकाणी पोहोचले आहे माहिती घेण्याचे काम करत आहे. सदरची गाडी नाशीक परिसरातील असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
सदर फोटो व प्रकरण दुसरे आहे. खालील व्यक्ती दिसला तर संपर्क साधा..