करमाळासोलापूर जिल्हा

नरभक्षक बिबट्याला पकडणे शक्य होत नसेल तर … दिले हे आदेश ; आमदार संजयमामा शिंदेच्या पाठपुराव्याला यश

करमाळा समाचार 

लिंबेवाडी व अंजनडोह तालुका करमाळा येथील नरभक्षक बिबट्याच्या हल्ला झाल्यानंतर करमाळा तालुक्याचे आमदार संजय शिंदे यांनी संबंधित बिबट्याला ठार मारण्याची आदेश द्यावेत याबाबत पाठपुरावा केला होता. त्याला वन विभागाकडून हिरवा कंदील मिळाला असून बिबट्याला बेशुद्ध करणे किंवा पकडणे शक्य नसल्यास जीवीतहानी होऊ नये. याचा विचार करून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी ठार मारण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण त्यापूर्वी शक्यतो सर्व प्रयत्न करावेत असेही आदेशात उल्लेख करण्यात आला आहे.

सदरच्या बिबट्याने औरंगाबाद परिक्षेत्र, बीड परिक्षेत्र तसेच मोहोळ परिक्षेत्रातील तब्बल दहा जणांचा बळी घेतल्यानंतर करमाळा तालुक्यात आणखीन जीवितास धोका निर्माण करू शकतो हे गंभीर लक्षात घेऊन नव्याने आदेश देण्यात आले आहेत.

 

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE