करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

चिवटे विरोधकांना धक्का ; निष्कासित सदस्यांना सक्रिय होण्याचे आदेश

करमाळा समाचार

भारतीय जनता पार्टी पदाधिकाऱ्यांनी पक्षविरोधी काम केल्यामुळे त्यांना निष्कासित करण्यात आले होते. परंतु पुन्हा एकदा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या आदेशाने संबंधित पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा सक्रिय होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

करमाळा विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपा शिवसेना व राष्ट्रवादीच्या महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार न करता अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांचा प्रचार करत असलेल्या व त्यांना पाठिंबा दिलेल्या जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, मंडळ अध्यक्ष राम ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव व युवा मोर्चा अध्यक्ष अमोल पवार यांच्यासह विनोद महानवर यांच्यावर पक्षाच्यावतीने कार्यवाही करण्यात आली होती.

politics

आता सदरची कारवाई माघारी घेत पुन्हा एकदा त्यांना सक्रिय काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे ज्या पदावरून त्यांना निष्काशीत करण्यात आले होते तेच पदे पुन्हा त्यांना बहाल करण्यात आली आहेत. केवळ विनोद महानवर यांच्याबाबत हा निर्णय घेतलेला दिसून येत नाही. बाकी इतरांना सक्रिय होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE