E-Paperसोलापूर जिल्हासोलापूर शहर

बनावट लिंकच्या कचाट्यातुन बाहेर पडण्याचा मार्ग ; मोफतच्या जाळ्यात अडकु नका

करमाळा समाचार –

कोणतीही गोष्ट मोफत मिळत असेल तर कसलाही विचार न करता आपले लोक धडाधड सिलेक्ट करत जातात. पण त्याचे काय परिणाम होतील याचा कोणीही विचार करत नाही. शक्यतो अशा लिंक पासून सावध राहिलेलं बरं, अनेकदा यातून आर्थिक फसवणूक झालेली ही दिसून आलेली आहे.

अशाच प्रकारच्या दोन वेगवेगळ्या लिंक सध्या व्हायरल होत आहेत. त्या संबंधित व्यक्तीच्या इच्छेशिवाय ही दुसऱ्याच्या ग्रुपमध्ये पटापट पडल्या जात आहेत. त्या थांबवायच्या कशा हा प्रश्‍न त्यांना ही पडला असून यासाठी ते स्वतःचे व्हाट्सअप हि डिलीट करत आहेत. पण यातून मार्ग निघत नाही, अशी परिस्थिती असल्याने भांबावून गेले आहे.

पण आपण यावेळी अडचणीत सापडला असला तरीही कमीत कमी आर्थिक नुकसान झाले नाही यात समाधानी राहायला हरकत नाही. आपण केलेल्या चुकीची शिक्षा ग्रुपमधील इतर लोकही भोगत असल्याचे दिसत आहे. शिवाय अशी चूक पुन्हा होऊ नये म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे. काहीही मोफत मिळत असेल तर ते का मिळत आहे याचीही पडताळणी करणे गरजेचे आहे.

ads

आता अशा संकटातून बाहेर पडण्यासाठी फक्त खालील गोष्टींचा वापर करून तुम्ही यातून बाहेर पडू शकता. जर तुमच्याकडून चुकून link Click झाली असेल तर खालील पर्याय वापरा.

Go to settings
*Apps manager
*Online stream apps
*Clear Catch
*Clear Data
*Force Stop
*Uninstall

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE