करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

नात्याला काळीमा फासणारी घटना ; आजोबाने असे केले तर विश्वास कोणावर ठेवायचा

करमाळा समाचार

करमाळा तालुक्यात एका गावात माणुसकीला तसेच नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे या प्रकरणात एका भावकीतील नात्याने चुलत आजोबा असलेल्या वृद्धाने अल्पवयीन नातीवर अत्याचार केल्याचा दुर्दैवी प्रकार घडला आहे याप्रकरणी मुलीने आईला कळल्यानंतर आई-वडिलांनी पोलिसात तक्रार देण्यासाठी पुढे आले आहेत सदर प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे

सदर मुलीची ओळख पटू नये त्यामुळे संबंधित आरोपी व गावाचे नाव आवर्जून लपवण्यात आले आहे. मुळातच सदरची घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून या घटनेची बातमी करताना आम्हाला अत्यंत वाईट वाटत आहे. परंतु असे नराधम व प्रकार लोकांसमोर उघड झाले पाहिजेत. त्यामुळे सदर वृत्त प्रसिद्ध करण्यात येत आहे. यामागे कोणालाही दुखावण्याचा कोणताही हेतू नाही फक्त अशा कृत्य आपल्या परिसरात होऊ नयेत यासाठी पालकांनी जागरूक राहिला पाहिजे.

अल्पवयीन मुलीला मागील दोन महिन्यांपूर्वी सदरचा वृद्ध व्यक्ती गोड बोलून जवळ घेत असे तिच्याशी संबंध प्रस्थापित करत असे. याची माहिती संबंधित मुलीला अधिक त्रास जाणवू लागल्यानंतर झाली. तिने तो त्रास आई जवळ बोलून दाखवला. त्यानंतर त्या वृद्धावर तक्रार देण्यासाठी सर्व समोर आले आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE