करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

विजेचा धक्का बसल्याने देवळाली येथील महिला ठार

करमाळा

देवळाली तालुका करमाळा येथे विद्युत प्रवाहाची तार तुटून पडल्याने टोमॅटोच्या शेतीत तारेवर विद्युत प्रवाह पसरलेला होता यावेळी टोमॅटो काढण्यासाठी गेलेल्या महिलेला झटका बसून तिचा त्यात मृत्यू झाला आहे सदरची घटना सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास देवळाली येथे घडले आहे. मुद्रुका संजय गुंड वय ४५ यांचा विद्युत प्रवाहाचे तार तुटून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे.

आठवड्यात ही दुसरी घटना आहे. शुक्रवारी हिवरे हनुमंत शिंदे हे सकाळी शेतामध्ये जात असताना उघड्या तारेचा त्यांना स्पर्श झाला. यावेळी त्यांना मोठा झटका बसला. यावेळी झालेल्या आवाजामुळे परिसरातील लोक गोळा झाले व त्यांनी तारेपासून शिंदे यांना बाजूला करीत शिंदे यांना करमाळा येथील दवाखान्यात नेले. परंतु उपचारापूर्वी ते मयत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.

सध्या पावसाळी दिवस आहेत. वादळी वाऱ्यासह पाऊस पडताना दिसत आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसह संबंधित विभागाने काळजी घेणे गरजेचे आहे. आपल्या परिसरात वादळी वाळल्यानंतर विद्युत वाहक तार तुटलेली आहे का याची पाहणी करणे संबंधित विभागाची जबाबदारी असल्याचे दिसून येते. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी शेतकरी व संबंधित विभाग दोघांनीही सतर्क राहणे गरजेचे आहे.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE