सरपंचाच्या घराशेजारचा गोठा जाळला ; दहशत माजवण्याचा प्रयत्न
करमाळा समाचार
शेतातील मोटार केबल चोरणे तसेच पुरातन भवानी मंदिर कडे जाणारा रस्ता बंद करून अडवणूक करणे असे प्रकार राजकीय हेतूने प्रेरित करीत असतानाच नुकतेच आळजापूर येथील शेतातील गोठा अज्ञात व्यक्तीने जाळून कुटुंबीयांवर दहशत पसरवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे तसेच जीविताला धोका असल्याचे तक्रार आळजपूर येथील सरपंच संजय रोडे यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. यासंदर्भात अद्याप गुन्हा दाखल केलेला नसल्याने तक्रार नोंदवावी अशी मागणी रोडे कुटुंबीयांकडून करण्यात आले आहे.
आळजापूर येथील रोडे वस्तीवरील रहिवासी हे सरपंच संजय रोडे व त्यांची आई ग्रामपंचायत सदस्य पार्वती रोडे आहेत. त्यांच्या गावात राजकीय विरोधक असल्याने वेळोवेळी जाणीवपूर्वक कुटुंबीयांना त्रास देण्याचे काम सुरू आहे. नुकताच १४ डिसेंबर रोजी रात्री एक ते दीड च्या सुमारास घराच्या पाठीमागे रस्त्यावर असलेल्या गोठ्यातील विजेचा बल्ब काढून अंधाराचा फायदा घेत जनावरांचा गोठा पेटवून दिला, यामध्ये संपूर्ण गोठा जळून खाक झाला आहे. तर एक वासरू भाजले आहे. बाकीचे जनावरे इतर ठिकाणी बांधलेले असल्याने ते वाचले. परंतु त्या ठिकाणी ठेवलेल्या शेतीच्या उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे.
तरी त्यात गोठ्याच्या शेजारी पत्र्याची खोली असून आग घराकडे आली नाही म्हणून घरातील सदस्य वाचले. तर असा जाणून बसून त्रास दिला जात असून गावातील राजकीय विरोधक हे राजकीय हेतूने करत असल्याचा संशय आहे. तसेच मागील आठवड्यात शेतातील मोटर केबल देखील चोरीला गेली होती. तर विविध मार्गाने कायम कुटुंबियांना त्रास दिला जात आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी सरपंच यांचे बंधू राजेंद्र रोडे यांनी केले आहे.