करमाळासकारात्मकसोलापूर जिल्हा

लॉकडाऊन मध्ये अडकुन पडलेल्या निराधारांना मोफत धान्य वाटप

करमाळा समाचार

निमगाव (ह) ता.करमाळा येथे ज्यांना रेशन कार्ड नाही, अत्यंत गोरगरीब, निराधार,असे नागरिक लॉक डाऊन मुळे अडकून पडले आहेत त्यांना किमान १० किलो ज्वारी मोफत वाटप करण्यात यावी म्हणून मा. समीर माने साहेब, तहसीलदार करमाळा यांच्या आदेशानुसार महसूल विभाग यांच्या वतीने धान्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. सदरील धान्य श्री.गायकवाड दादा, मंडल अधिकारी सालसे, गाव कामगार तलाठी श्री. रावसाहेब गवळी यांचे कडून मिळाले होते. त्या प्रमाणे १० किलो ज्वारी मोफत वाटप करण्यात आली आहे.

१) आण्णा विटकर
२) सुगंधा दंडगुले
३) शबाई कांबळे
४) रेखा संजय सल्ले
५) सरस्वती शेंडगे
या प्रमाणे वरील लोकांना मोफत ज्वारी वाटप करण्यात आली आहे.

ज्वारी वाटप करताना सरपंच श्रीमती शकुंतला मधुकरराव नीळ, सिना कोळगाव धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सतीश नीळ पाटील, नानासाहेब रोकडे मेजर, उपसरपंच विठ्ठल जगदाळे, सुभाष रोकडे, सुभाष भोसले, गणेश नीळ, बाळू जगताप, दत्ता मामा साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य मुक्ताबाई ननवरे, गोकुळ साबळे, ज्येष्ठ नागरिक औदुंबर भोसले आदी जण उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE