अ.भा.वि.प चा 28 ऑगस्टला विद्यापीठावर धडक मोर्चा – शुभम बंडगर
प्रतिनिधी सुनिल भोसले
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे अशी मागणी अ भा वि प ने केलेली आहे .ही मागणी मान्य न केल्यास २८ ऑगस्ट रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे विद्यापीठावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे, असे अ भा वि परिषदचे जिल्हासहसंयोजक शुभम बंडगर यांनी सांगितले.

सर्वच अभ्यासक्रमांच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा या शासनाने रद्द केल्या आहेत. त्यामुळे शासनाने या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करावे. शुल्क परत करता येत नसल्यास पुढील वर्षी त्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारले जाऊ नये अशी अभाविपची मागणी आहे.
यासंदर्भात अभाविपच्या प्रतिनिधींनी विद्यापीठ प्रशासनाशी चर्चा केली . विद्यापीठाच्या सक्षम समितीची बैठक होणार, त्यानंतर शुल्काबाबतचा निर्णय घेणार असल्याचे विद्यापीठाने अ भा वि परिषदला पत्र लिहून कळविले आहे. अभाविप आपल्या मागणीवर ठाम असून विद्यापीठाने परीक्षा शुल्क माफ न केल्यास धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चामध्ये सोलापुर शहरासह, मोहोळ, पंढरपूर, करमाळा , बार्शी, अकलूज, सांगोला,अक्कलकोट आदी ठिकाणांहून विद्यार्थी सहभाग घेणार आहेत. मोर्चादरम्यान फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येणार असून सॅनिटायझरचा वापर करण्यात येणारअसल्याचे बंडगर यांनी सांगितले.