करमाळासोलापूर जिल्हा

कुकडी लाभक्षेत्रात मांगी घेण्यासाठी उद्या अधिकारी आमदारांसोबत बैठक ; आज खा. नाईक निंबाळकरासोबत सकारात्मक चर्चा

करमाळा समाचार

मांगी तलाव कुकडी लाभक्षेत्रात विलीन करण्यासाठी भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे येथे खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चे नंतर उद्या सिंचन भवन पुणे येथे कुकडीचे अधिकारी व परिसरातील सर्व आमदार यांच्या सोबत बैठकीचे आयोजन सकाळी आकरा वाजता करण्यात आले आहे. यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याचे चिवटे यांनी सांगितले.

पुढे बोलताना चिवटे म्हणाले, मांगी तलावावर आज २२ गावातील शेती अवलंबून आहे. तसेच १३ गावच्या पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. मांगी तलावात फक्त कर्जत तालुक्यातील पाणी येते. कर्जत तालुक्यातील नद्या, ओढ्यावर अनेक बंधारे, मातीनाले झाल्याने मांगी तलावात पावसाचे पाणी येत नाही. परिणामी वर्षानुवर्षे तलाव कोरडा राहतो. यामुळे याचा प्रतिकुल परिणाम तलावावर अवलंबून असणाऱ्या शेती व पाणी पुरवठा योजनावर होतो.

यामुळे मांगी तलाव कुकडी लाभलाक्षेत्रात समाविष्ट होणे गरजेचे आहे. ही लोकांची गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रमुख मागणी आहे. आज राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार आहे. माढा लोकसभा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आपण हा प्रश्न सोडवून घेणार आहोत. याबद्दल खासदारांनी सकारात्मक अनुकूलता दर्शवली आहे असे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे,बाळासाहेब कुंभार, रामभाऊ ढाणे, संजय घोरपडे , बिटगावचे सरपंच डॉ.अभिजीत मुरुमकर, वंजारवाडीचे सरपंच प्रवीण बिनवडे, श्याम सिंधी, बाळासाहेब होसिंग, धर्मराज नाळे, दादासाहेब देवकर,दासाबापु बरडे, अमोल पवार, नितीन झिंजाडे, विष्णू रंदवे, मच्छिंद्र हाके, सोमनाथ घाडगे, आजिनाथ सुरवसे, विनोद महानवर, जयंत काळे पाटील,हर्षद गाडे, किरण शिंदे,आबा वीर, कैलास पवार, समाधान काळे, संदीप काळे, लक्ष्मण काळे, किरण बागल, प्रकाश ननवरे, विशाल घाडगे, मनोज मुसळे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE