राजयोग समोर अपघात ; आयशर टेंपो थेट घाडगेंच्या दुकानात
करमाळा समाचार
अहमदनगर ते टेंभुर्णी रस्त्याने जात असताना पिकअप व आयशर टेम्पोचा झालेल्या अपघातात दोन्ही गाड्यांचे चालक गंभीर जखमी झाले आहे. सदरचा अपघात राजयोग हॉटेल समोर घाडगे पाटील कन्स्ट्रक्शन यांच्याजवळ झाला आहे. सदरचा आयशर टेम्पो हा थेट घाडगे पाटील समूहाचे बिल्डींग मटेरीअल व हार्डवेअर या दुकानात जाऊन बसल्याने घाडगे पाटील यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

पिकअप क्रमांक एम एच 42 ए आर 7027 सदरची गाडी ही करमाळा च्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या विना क्रमांकाच्या आयशर टेम्पो ने अचानक समोर आल्याने दोघांचाही या घटनेत आपल्या वाहनांवरील ताबा सुटला व सदरची गाडी ही रस्त्याच्या खाली उतरली. त्यामुळे गाडी थेट जाऊन घाडगे यांच्या दुकानात घुसली. यावेळी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु घाडगे व ट्रक चालक तसेच पिकप चालकाचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे.

यावेळी पोलीस घटनास्थळी पोहोचल्या असून ड्रायव्हरला सुखरूप त्याच्या बाहेर काढले आहे व त्याला दवाखान्यात पाठवण्याची नियोजन करण्यात येत आहे. सदर घटनास्थळी लोकांनी गर्दी केले असून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी वाहतूक पोलीस प्रदीप जगताप व दीपक कांबळे हजर झाले व वेळीच त्यांनी चालकाला बाहेर काढण्यास सहकार्य केले. याशिवाय ज्यांच्या दुकानाचे नुकसान झाले त्यांनी ही चालकाला बाहेर काढण्यास मदत केली व विचारपूस केली.